आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Opinion
  • Opinion By N Raghuraman Learn New Skills From The Lives Of Successful People

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मॅनेजमेंट फंडा:यशस्वी लोकांच्या जीवनातून नवीन कौशल्ये जाणून घ्या

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

‘मॅडम सेक्रेटरी’ ही २०१४ ची टीव्ही मालिका आजही माझ्या आवडीची आहे. मी त्याच्या ६ सिझनचे १२० भाग पाहिले आहेत. ती एका सीआयए अॅनालिस्टची कथा आहे. त्या नैतिक कारणावरून नोकरी सोडतात आणि त्यांना अमेरिकेच्या सेक्रेटरी आॅफ स्टेट म्हणून नियुक्त केले जाते. या मुख्य पात्राचे नाव एलिझाबेथ मॅकाॅर्ड आहे. त्या आपल्या पूर्वीच्या व्यक्तीच्या संशयास्पद मृत्यूनंतर राष्ट्राध्यक्षांच्या आग्रहाखातर सार्वजनिक जीवनात परततात. त्यांचे वरिष्ठ त्यांचा अराजकीय कल, मध्य-पूर्वेची माहिती, भाषा कौशल्य आणि सर्जनशील विचाराची कदर करतात. एलिझाबेथ आंतरराष्ट्रीय मुत्सद्देगिरी सांभाळतात, कार्यालयीन राजकारणाशी लढा देतात आणि प्रोटोकाॅलला टक्कर देतात, याबरोबरच राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर चर्चाही करतात. असे लोक अमेरिकेची आज आहे तशी ‘शक्तिशाली प्रतिमा’ तयार करतात. माझ्यासाठी ही नेहमीच अशी मालिका असेल जिथे प्रत्येक गोष्ट अमेरिकेची शक्तिशाली आणि सामर्थ्यवान प्रतिमा टिकवून ठेवण्यासाठी असते. शब्दांचा वापर हुशारीने कसा करायचा, हे मी या मालिकेतून शिकलो.

ही मालिका पाहताना मी नेहमी विचार करत असे की, यात पाहिल्याप्रमाणे अमेरिका एखाद्या महिलेला इतकी शक्तिशाली होऊ देईल का? हिलरी क्लिंटन माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून पराभूत झाल्या तेव्हा माझ्या आशेवर पाणी फिरले.

परंतु, शुक्रवारी कमला हॅरिस यांनी अमेरिकेच्या इतिहासातील पहिल्या महिला उपराष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली आणि माझ्यात नवी उमेद निर्माण झाली. मॅडम व्हॉइस प्रेसिडेंट टीव्ही मालिकेतील मॅडम सेक्रेटरीप्रमाणे वागतील, अशी मला आशा आहे. अमेरिकनांनाही वाटते की, ७८ वर्षीय राष्ट्राध्यक्षांनी कमला यांना निवडण्याचे कारण म्हणजे बायडेन यांना काही झाले तर त्या केव्हाही त्यांची जागा घेऊ शकतील. कमला एकट्या नाहीत, तर कॅबिनेट व सब-कॅबिनेटच्या अनेक प्रमुख पदांवर अमेरिकन प्रशासनाच्या इतिहासात आधीच्या तुलनेत अधिक महिला आहेत. कमला यांनी महिलांबद्दल सार्वजनिक द्वेष, लिंगभेद, वंशद्वेष, कट्टरता सहन केली आणि तरीही सर्व अडथळे पार केले. आणखी एक व्यक्ती आहे. ते तेलंगणच्या छोट्या गावातून गेलेले असून, त्यांनी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांची भाषणे लिहून दिली. सी. विनय रेड्डी हे बायडेन यांच्या टीममध्ये भाषण लेखनाचे संचालक आहेत. ते करीमनगर जिल्ह्यातील पोथिरेड्डीपेटा गावचे आहेत. स्थलांतरित कुटुंबातील मुलगा असलेले विनय ओहियोमध्ये मोठे झाले आणि इंजिनिअरिंग करण्याऐवजी त्यांनी स्टेट युनिव्हर्सिटी काॅलेज आॅफ लाॅमधून शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला. सध्या ते न्यूयाॅर्कमध्ये पत्नी आणि दोन मुलींसह राहतात. २०१३-१७ मध्ये बायडेन उपराष्ट्राध्यक्ष होते, तेव्हापासून ते त्यांच्या टीममध्ये आहेत. अध्यक्षीय निवडणुकीच्या प्रचार मोहिमेदरम्यान जो बायडेन आपला प्रत्येक शब्द सावधपणे निवडू शकत होते आणि ट्रम्प यांच्या जाळ्यात फसण्यापासून सुरक्षित राहत होते, याचे सर्व श्रेय विनय यांनी अतिशय काळजीपूर्वक तयार केलेल्या भाषणांना जाते.

आज कमला आणि विनय यांच्या गावांतील लोक त्यांच्या या यशाचा उत्सव साजरा करत आहेत. परंतु, हे दोघे या स्थानापर्यंत कसे पोहोचले याबाबहीत ते तरुणांना सांगतील, अशी मला आशा आहे.

फंडा असा : प्रत्येक यशस्वी व्यक्तीचे आयुष्य सखोलपणे जाणून घ्या आणि त्यांचे जीवन बदलून टाकणाऱ्या छोट्या छोट्या गोष्टीही पाहा.

मॅनेजमेंट गुरू : एन. रघुरामन
raghu@dbcorp.in

बातम्या आणखी आहेत...