आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Opinion
  • Opportunities For Anti unity Are Now Becoming Rare | Agralekh Of Divya Marathi

अग्रलेख:आता दुर्मिळ होत आहेत विरोधी एकजुटीच्या संधी

औरंगाबाद13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत ‘कोण जिंकणार’ हे सांगणे हा एक साधा अंकगणितीय प्रश्न आहे. या वेळीही भाजप उमेदवाराचा विजय जवळपास निश्चित आहे, पण यामुळे विरोधकांनी शांत बसावे का? राष्ट्रपती किंवा सभापती यांसारख्या पदांसाठी बिनविरोध निवडणुका घेणे ही चांगली पद्धत आहे, पण देश ज्या प्रकारच्या राजकीय संघर्षात आहे, त्यात एकमत होणे अशक्य आहे.

अशा स्थितीत मोठ्या आणि बलाढ्य सत्ताधारी पक्षाशी एकदिलाने लढण्याची विरोधकांना संधी आहे, जेणेकरून विरोधक आपल्या भूमिकेसाठी सज्ज असल्याचा संदेश जनतेपर्यंत जाईल. मात्र, राष्ट्रपती निवडणुकीत विरोधी पक्षांचे एकमेकांपासून अंतर ठेवून सहमती शोधणे त्यांच्या हुशारीबाबत खेदजनक आहे. भाजप राजकीय, सामाजिक आणि आर्थिक स्तरावर आपला जनाधार वाढवण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करत असताना विरोधी पक्षांची एकजूट आजही फसवीच आहे. सामायिक उमेदवार उभा करण्यासाठी झालेल्या बैठकीत काँग्रेस नव्हती, आप अनुपस्थित होता, तर भाजपला बसपकडून मोठ्या आशा आहेत. वायएसआर काँग्रेसकडूनही भाजपला अशीच काहीशी आशा आहे. बिहारमध्ये भाजपसोबत सरकार स्थापन करणारी जद(यू) सोडा, ओडिशातील सत्ताधारी बिजददेखील भाजप उमेदवाराला पाठिंबा देईल. त्यातही विरोधी पक्षांच्या एकजुटीचा अभाव खटकतो.

बातम्या आणखी आहेत...