आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहिलांच्या प्रगतीबद्दल शायर कैफी आझमी म्हणाले होते- ‘उठ मेरी जान|मेरे साथ ही चलना है तुझे| कद्र अब तक तेरी तारीख ने जानी ही नहीं| अपनी तारीख का उनवान बदलना है तुझे...’ भारतातील महिलांना एसटीईएम (विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, गणित) क्षेत्रात करिअर करण्यासाठी अनेक अडथळे पार करावे लागतात, पण आता त्यांनी या दिशेने मोठी प्रगती केली आहे आणि स्वतःसाठी अधिक न्याय्य वातावरण निर्माण करण्यासाठी सक्रियपणे काम करत आहेत. त्यांच्या प्रयत्नांमुळे लैंगिक अडथळे दूर होत आहेत आणि महिलांना चांगले प्रतिनिधित्व मिळत आहे. एसटीईएम अंडरग्रॅज्युएट अभ्यासक्रमांमध्ये तरुण मुलींची नोंदणी वर्षानुवर्षे वाढतच आहे. उद्योगाच्या सकारात्मक पाठिंब्याने आणि अनुकूल सामाजिक वातावरणामुळे भारत या क्षेत्रातील महिलांच्या प्रतिनिधित्वात अग्रेसर बनू शकतो आणि लिंगभेद न करणारे भविष्य घडवू शकतो. भारत सरकारच्या सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या अलीकडील अहवालानुसार, आज एसटीईएम कर्मचाऱ्यांपैकी १४.१ टक्के महिला आहेत आणि येत्या काही वर्षांत ही संख्या वाढण्याची अपेक्षा आहे. जागतिक बँकेचा विश्वास आहे की, भारताच्या कर्मचाऱ्यांमध्ये महिलांचा एकूण सहभाग वाढवण्याची गरज आहे, कारण त्यांना इको-सिस्टिममधील आव्हानांचा सामना करावा लागतो. मात्र, आता हे चित्र बदलू लागले आहे. सरकारचा पुढाकार : वीएस या महिला व्यावसायिकांसाठीच्या वैयक्तिक विकास व्यासपीठाच्या सीईओ अनुरंजिता कुमार म्हणतात, एसटीईएममध्ये महिलांचा सहभाग २० व्या शतकाच्या सुरुवातीपासून पाहता येतो, तेव्हा पहिल्या महायुद्धात क्रिप्टोग्राफी टीमचे नेतृत्व महिलांनी केले होते. पण सामाजिक पूर्वग्रहांमुळे त्यांचा या क्षेत्रातील सहभाग कमी झाला. आपल्या आढळेल की, अनेक तंत्रज्ञान-डिझाइन - मग ते इलेक्ट्रॉनिक्स असो किंवा ऑटोमोबाइल - जाणूनबुजून किंवा नकळत पुरुषांना टार्गेट ऑडियन्स म्हणून केंद्रस्थानी ठेवून बनवले जातात. हे बदलायला हवे. सुदैवाने आता ‘गती’ आणि ‘किरण’सारख्या सरकारी योजनांद्वारे या दिशेने सकारात्मक पावले उचलली गेली आहेत. जेंडर अॅडव्हान्समेंट फॉर ट्रान्सफॉर्मिंग इन्स्टिट्युशन्स (गती) मध्ये एसटीईएम क्षेत्रात महिलांचे समान प्रतिनिधित्व वाढवण्याच्या गरजेवर एक धडा आहे. ते नॉलेज इन्व्हॉल्व्हमेंट रिसर्च अॅडव्हान्समेंट थ्रू नर्चरिंग (किरण) च्या सहकार्याने काम करतात. महिलांसाठी नोकऱ्या : भारतातील व्यावसायिक आणि तांत्रिक क्षेत्रातील महिला कर्मचाऱ्यांची संख्या २९.२ टक्क्यांवरून आता ३२.९ टक्के झाली आहे. कंपन्या त्यांच्या कर्मचाऱ्यांमध्ये विविधता आणण्यावर भर देत आहेत. टेक डोमेन हे महिलांचे सर्वात मोठे नियोक्ते झाले आहे. ३८ टक्के महिला कर्मचारी प्रवेश स्तरावर आहेत, तर २६, १९ आणि १७ टक्के महिला अनुक्रमे व्यवस्थापन, वरिष्ठ व्यवस्थापन आणि कार्यकारी पदांवर आहेत. कंपन्या फॉरेन्सिक्स, सायबर सिक्युरिटी, क्लाउड कॉम्प्युटिंग, डेव्होप्स, ब्लॉकचेन यांसारख्या विशिष्ट कौशल्य संचांमध्ये महिलांची प्रतिभा शोधत आहेत. आता आपण डिजिटल युगात प्रवेश केल्याने नवीन शक्यताही निर्माण झाल्या आहेत. त्यामुळेच मुलींना प्राथमिक एसटीईएम शिक्षण घेणे आवश्यक झाले आहे, तरच त्यांना डिजिटल क्रांतीचा लाभ घेता येईल. तुम्ही काय करू शकता : महिलांच्या नेतृत्वाखालील नेटवर्क आणि कम्युनिटीमध्ये सहभागी व्हा. तुम्ही तुमच्या व्यावसायिक प्रवासाची उत्तम प्रकारे योजना कशी करू शकता, हे समजून घेण्यासाठी वरिष्ठ महिला व्यावसायिकांची मदत घ्या. शिरोज हे महिलांसाठीचे सामाजिक नेटवर्क या क्षेत्रातील एक महत्त्वाची इको-सिस्टिम म्हणून उदयास आले आहे. ते महिलांच्या विकासासाठी एक आश्वासक, समजूतदार वातावरण प्रदान करते, तिथे त्या व्यावसायिक विकास शकतात. त्यांनी पात्र, प्रशिक्षित आणि प्रमाणित महिला एक्झिक्युटिव्हची एक प्रभावी रिमोट-टीम तयार केली आहे, ती अनेक व्यवसाय-उपाय सुचवते. ही व्यावसायिकांसाठी सहज उपलब्ध क्लाउड वर्कफोर्स आहे. याच्या मदतीने तुम्ही ज्ञान आणि कौशल्याचे एक मजबूत व्यासपीठ बनवू शकता, ते तुम्हाला एसटीईएम क्षेत्रात करिअर करण्यात मदत करेल. (ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत.)
पंकज न्ंसल Taggd (डिजिटल रिक्रूटमेंट प्लॅटफॉर्म) व वर्क युनिव्हर्सचे सहसंस्थापक, @pankajbansalPB.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.