आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मॅनेजमेंट फंडा:अपघात टाळण्यासाठी गाडीच्या बाहेरदेखील लक्ष द्या!

औरंगाबाद23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

एक चालक ७० किमी/तास वेगाने गाडी चालवत असताना मोबाइल काॅल घेतो, अशी कल्पना करा. अशा वेळी आपत्कालीन परिस्थितीत चालकाला ब्रेक लावण्यास पाच सेकंद उशीर होऊ शकतो, असे तज्ज्ञ म्हणतात. संशोधनात असेही आढळले की, या वेगाने वाहन अर्ध्या सेकंदात ५१ फूट जाऊ शकते, ते अपघातासाठी पुरेसे आहे. ही आकडेवारी आम्ही लक्झरी कार निर्माता मर्सिडीज-बेंझच्या अंतरिम अहवालावर चर्चा करत असताना इंदूरचे समुपदेशन मानसतज्ज्ञ डॉ. संदीप अत्रे यांनी सांगतली. हा अहवाल उद्योगपती सायरस मिस्त्री यांच्या जीवघेण्या अपघातानंतर सादर केला आहे. अहवालानुसार, अपघाताच्या काही सेकंद आधी कार १०० किमी / तासाच्या वेगाने जात असताना पुलावरील दुभाजकावर आदळली तेव्हा तिचा वेग ताशी ८९ किमी होता. टक्कर होण्याच्या पाच सेकंद आधी ब्रेक लावले होते. आणखी एक धक्कादायक आकडेवारी अशी की, भारतामध्ये जगातील १% वाहने आहेत, परंतु जगातील रस्ते अपघातांतील मृत्यूंपैकी ११% भारतात होतात. एखाद्या मोठ्या व्यक्तिमत्त्वाच्या मृत्यूनंतरच या आकडेवारीबद्दल बोलले जाते, असे नाही. फार पूर्वी चहा कंपन्यांनीही ट्रक ड्रायव्हर्सना त्यांच्या जाहिरातींमध्ये सांगायला सुरुवात केली की, त्यांचा चहा ड्रायव्हर्सना लांबच्या प्रवासासाठी जागृत ठेवतो. कार कंपन्यांनी सीट बेल्ट आणि एअर बॅगवर लक्ष केंद्रित केले, तर आरटीओने चालकांसाठी वेग मर्यादांवर लक्ष केंद्रित केले. एकंदरीतच वाहनांच्या सुरक्षेच्या उपाययोजनांकडे सर्वांचे लक्ष होते, पण केवळ चालकाच्या चुकीमुळे अपघात घडत नव्हते. याला बाह्य घटकही कारणीभूत होते. उदा. रस्त्यावर येणारे प्राणी, माणसांचे चुकीचे वळण घेणे, शॉर्टकट वापरून दुभाजक ओलांडणारे वाहनचालक आदी. प्रश्न असा आहे की, बाहेरील धोक्यांबाबत चालकांना अगोदर इशारा कोण देणार?

भारताकडे काही उत्तरे आहेत, परंतु थोड्या प्रमाणात. जेहान कोटवाल यांचे उदाहरण पाहा, ते वडिलांकडून मिळालेला वाहतूक व्यवसाय चालवतात. वडील व्यवसाय चालवत असताना त्यांच्याकडे १० ट्रक होते आणि वर्षातून दोन-तीन अपघात होत असत. व्यवसाय वाढला आणि आज त्यांच्याकडे ११० ट्रक असून अपघातांची संख्या एक झाली आहे. जेहान यांना असे परिणाम कसे मिळाले? कारण वाहनाच्या बाहेरूनही माहिती गोळा करणारे ‘मोबाइलआय’सारखे अनेक अॅप्लिकेशन्स उपलब्ध आहेत. डिव्हाइसचे दोन भाग आहेत. पहिला म्हणजे विंडशील्डवर बसवलेला कॅमेरा रस्त्याकडे असतो. दुसरा चालकाच्या उजव्या असतो, तो इशारा देण्यासह चालकाच्या हालचालीवर लक्ष ठेवतो. अशा उपकरणे मानवी नजरेतून सुटणाऱ्या गोष्टी वाहनासमोर येणाऱ्या गोष्टी दाखवतात. ते चालकाला स्क्रीनवर त्याबाबतचा इशारा देतात. जेहान यांनी स्वतः सुमेध मानेसोबत ‘हमसफर’ हे अॅप तयार केले आहे. ते चालकांना क्रिकेट आणि बॉलीवूडच्या प्रश्नमंजूषांमध्ये गुंतवून ठेवते, त्यांच्याशी ‘चहाचा आस्वाद घ्या’, ‘ट्रक थकला, तुम्ही थकला नाहीत का?’ असे बोलतात. चालकाने नीट डोळे मिचकावले तरी अॅप इशारा देतो, ‘उस्ताद उठा, तुम्ही झोपत आहात.’ सध्या २०,००० ट्रक चालक त्यांचे हे अॅप वापरत आहेत. फंडा असा की, तरुणांनी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून वाहनाच्या आत-बाहेर बघून मानव आणि अभियांत्रिकीच्या मर्यादेवर उपाय शोधले तर त्यांनी यशाची अधिक शक्यता आहे.

एन. रघुरामन, मॅनेजमेंट गुरू [raghu@dbcorp.in]

बातम्या आणखी आहेत...