आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराफंडा असा की, आयुष्यात बदल करण्यासाठी हुशार, श्रीमंत किंवा सुंदर असणे आवश्यक नाही. फक्त आपल्या कामात तरबेज होणे आणि जेव्हा सर्वाधिक गरज असते तेव्हा करण्याची गरज असते.
गेल्या मंगळवारी अमेरिकेत दुपारी १२.०३ वा. कुणीतरी आपत्कालीन क्रमांक ९११ वर फोन केला आणि हळू आवाजात सांगितले, ती टेक्सास एलिमेंट्री शाळेच्या ११२ क्रमांकाच्या वर्गात आहे आणि तेथे अनेक जण मृत आहेत. त्या फोनच्या आधीच अर्ध्या अमेरिकेला त्या भीषण घटनेची माहिती झाली होती. त्यात एक बंदूकधाऱ्याने शाळेत मुले-शिक्षकांवर गोळीबार केला होता. फोनवरील तरुणीने सांगितले, ८-९ मुले अजूनही जिवंत आहेत. अर्ध्या तासानंतर १११ क्रमांकाच्या वर्गातून एका मुलीने फोन करून सांगितले, शेजारच्या खोलीतून तिला कुणाचा तरी आवाज येत आहे. तिने विनंती केली, कृपया पोलिस अधिकाऱ्यांना आत पाठवा. शाळेबाहेर १९ अधिकारी हजर होते आणि सर्वांना माहिती होते, आत एक हल्लेखोर आहे. अधिकारी हल्लेखोराचा सामना करण्यात तरबेज होते, क्षणाचाही विलंब न करता आत जाऊ इच्छित होते. दुर्दैवाने त्यांनी याच्या उलट केले, ते हल्लेखोरास ठार करण्यासाठी गेले नाहीत. पोलिस प्रमुखांनी ठरवले, जेथे हल्लेखोर लपला, त्या वर्गात जाण्यासाठी त्यांना जास्त उपकरणे तसेच आणखी अधिकारी हवे होते. जोपर्यंत यूएस बॉर्डर पेट्रोल टॅक्टिकल युनिट येत नाही तोपर्यंत बंदूकधाऱ्यावर कारवाईसाठी पथक हलले नाही, उलट ते कोणत्याही संस्थेशी संबंधित असले तरी अशा स्थितीत कारवाईसाठी प्रशिक्षित होते.
अशा स्थितीत त्यांना एखाद्या नेतृत्वाची गरज नव्हती. त्यांना फक्त सज्ज होत गोळ्यांचा आवाज येत होता त्या दिशेने जात हल्लेखोर ठार होत नाही तोपर्यंत गोळीबार करायचा होता. त्यातील प्रत्येक पोलिसाकडे बुलेटप्रूफ गिअर होते, तर मुलांना कोणतेही संरक्षण नव्हते. या दृष्टीने ते इमारतीला सहज घेराव घालू शकले असते. कारण त्यांची संख्या १९ होती तर हल्लेखोर १८ वर्षांचा किशोर होता. त्या हल्लेखोराने १९ मुले आणि दोन शिक्षकांची हत्या केली. ते स्वत:तर आत गेले नाहीतच, उलट मुलांच्या बहाद्दर नातेवाइकांनाही आत जाण्यापासून रोखले. पोलिसांनी बंदूकधाऱ्याला ठार करण्यात एक तास २२ मिनिटे लावली. त्याने ११.२८ लार कारने शाळेच्या प्रवेशद्वाराला धडक दिली, मोठी बंदूक घेऊन शाळेत घुसला आणि गोळीबार सुरू केला. १२.५० ला हल्लेखोर ठार झाला. अमेरिकेतील सर्व तज्ज्ञ पोलिस या धिम्या कारवाईने आश्चर्यचकित आहेत.
पोलिसांच्या चुकीचा अंदाज यातून येतो. त्यांना ९११ वरून माहिती मिळाली होती, त्या बॅरिकेटेड वर्गात अजूनही मुले जिवंत आहेत. म्हणजे आतील मुले त्यांना वाचवण्यासाठी पोलिसांना विनंती करत होते आणि वर्गात जाण्यासाठी अधिकारी योजनाच आखत होते. अधिकाऱ्यांच्या सुरक्षेमुळे पोलिस प्रमुख घाबरले असतील, मात्र त्यांचे काम जीव देऊन नि:शस्त्र मुलांचे संरक्षण करणे होते. आश्चर्य म्हणजे पोलिस प्रमुखांना त्या विभागात २० वर्षे झाली आहेत आणि ते त्यांच्या अनुभवासाठी ओळखले जातात. टेक्सास डिपार्टमेंट ऑफ पब्लिक सेफ्टीचे संचालक स्टीव्हन मॅक्राॅ यांनी अखेर मान्य केले की, तो निर्णय चुकीचा होता. जर पोलिस, अग्निशमन, बसचालक, रेल्वे आणि विमानाचे पायलट लोकांची सुरक्षा वा सुरक्षित प्रवास हे त्यांचे काम करत नसतील तर गणवेशाबाबतच्या सन्मानावर परिणाम होईल. हे त्यांनाच नाही तर इतर व्यावसायिकांनाही लागू होईल.
एन. रघुरामन मॅनेजमेंट गुरू raghu@dbcorp.in
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.