आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जीवनमार्ग:शारीरिक-मानसिक आरोग्य जागरूकता अत्यंत गरजेची

पं. विजयशंकर मेहता5 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सध्या संपूर्ण जग, आपला देश आणि आपणही कुठे तरी आर्थिक आघाडीवर संघर्ष करत आहोत. काही अज्ञानी लोक आजही आर्थिक आघाडी सोडून जातीय आघाडीवर दंगली करत आहेत, खरे तर अशा वेळी आपली सर्व शक्ती आपली आर्थिक परिस्थिती हाताळण्यात लावायला हवी. यासाठी निरोगी राहणे अत्यंत आवश्यक आहे. आरोग्यामध्येही विशेषतः मानसिक आरोग्य. आता आर्थिक सुधारणेचा मार्गही आरोग्यातून जाणार आहे.

सरकारी आरोग्य यंत्रणा सवलतींवर, तर खासगी यंत्रणा लुटीवर उभी आहे. अशा स्थितीत अत्यंत जागरूक राहून स्वत:च्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. देवाने माणसाला तळापासून वर ऊर्जा नेण्यासाठी सात चक्रे दिली आहेत. ऊर्जा वर आलेली असेल तर तुम्ही मानसिकदृष्ट्या निरोगी आहात. ही ऊर्जा खाली (नाभीच्या खाली) असेल तर तुम्ही तणावग्रस्त आहात. उंची गाठायची असेल तर उडी मारावी लागेल, असे शास्त्रात लिहिले आहे. येथे उंची म्हणजे चेतनेचा वरचा भाग. आपल्या डोक्याच्या मध्यभागी असलेल्या सहस्रार चक्रात दिवसातून एकदा ऊर्जा घेऊन जाणे आवश्यक आहे. उंचीवर आरोग्य आहे, प्रेम आहे. खाली वासना आहे. आपण काही वेळ आत्म्याजवळ बसतो तेव्हा जगापासून दूर असतो. आर्थिकदृष्ट्या यशस्वी व्हायचे असेल तर शारीरिक व मानसिक आरोग्य या दोन स्तरांवर काम करा.

बातम्या आणखी आहेत...