आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआज साहित्याबद्दल बोलूया. कथांबद्दल चर्चा करूया. कथा प्रत्यक्षात लिहिल्या किंवा सांगितल्या जात नाहीत. त्या घडतात… आणि आपल्या आत किंवा बाहेर जे काही जाणीवपूर्वक घडते, ते कुठे तरी, कधी तरी, कुठल्या ना कुठल्या लेखणीतून कथेचे रूप घेते. खरे तर आयुष्यात असे अनेक क्षण येतात, जे काळाच्या उदरातून जन्माला येतात आणि काळाच्याच गर्भात पडतात, कधी कधी हे क्षण आपल्यासमोर उभे राहतात. आपण विचार करतो की, काळाची ही थडगी कशी उघडली गेली? आणि हे क्षण कबरीतून कसे जिवंत झाले? हा कयामतचा दिवस किंवा रात्र आहे की काय? अशा घटनांना आपण आठवणी असेही म्हणू शकतो. मग वाटते, आठवणी जिवंत असत्या तर आपण त्यांच्याशी जवळ बसून गप्पा मारल्या असत्या. हास्य-विनोद केला असता! पण हे शक्य आहे का? असो, ज्या युगात आपण पुस्तकी साहित्याबद्दल बोलत आहोत, त्या काळात पुस्तके वाचायला फारच कमी वेळ उरला आहे. पुस्तके वाचणारे लोक कमी झाले आहेत. पाठ्यपुस्तकांच्या व्यतिरिक्त इतर गोष्टींबद्दल बोललो तर सत्य असे आहे की, आता सर्व अभ्यास फक्त फेसबुक आणि व्हॉट्सअॅपवरच होतो. तिथेच अभ्यास असल्याने लेखनही पूर्णपणे फेसबुक आणि व्हॉट्सअॅपवरच केले जाते. आता आपल्याला वाचक किंवा लेखक नव्हे, फेसबुके किंवा व्हॉट्सअॅपे म्हणवून घेणे जास्त आवडते. जग असेच आहे, त्या कोण काय करणार? आजच्या तरुण पिढीला लिहिण्या-वाचण्याचा सल्ला अनेक नामवंत लेखक आणि साहित्यिक देतात. ते म्हणतात, फेसबुक आणि व्हॉट्सअॅपव्यतिरिक्त पुस्तकांमध्येही डोकावा, काही कथा वाचा. काहीच नाही तर आजी-आजोबांनी लिहिलेली जुनी अंतर्देशीय पत्रे वाचा. काहीच सापडले नाही तर जुन्या, फाटलेल्या वह्या किंवा कॅलेंडरच्या रिकाम्या कोपऱ्यात लिहिलेले दुधाचे खाते वाचा. पण, रोज काही तरी वाचा! बाकी काही नसेल तर आजींच्या काही कथा, किस्से ऐका! पण अवश्य ऐका. ऐकणे महत्त्वाचे आहे, कारण ते आपल्यामध्ये संयम निर्माण करते. आपल्या विचारांची व्याप्ती वाढते. त्याला नवा आयाम मिळतो. …आणि सध्या जगात पुढे जाण्याची, मागे सोडण्याची स्पर्धा सुरू असताना आपण आपला विचारही पुढे नेणे खूप गरजेचे आहे. प्रत्येक स्तरावर. प्रत्येक प्रसंगी. युद्धाची परिस्थिती असो वा गृहयुद्ध, ती परिस्थिती वाचनाची असो वा लेखनाची किंवा अध्यापनाची असो, कोणत्याही परिस्थितीत विचार उच्चच असावेत. …आणि हे सर्व केवळ वाचनानेच शक्य आहे. त्यामुळेच सर्व महान लेखक आणि साहित्यिक तरुण पिढीला पुस्तके वाचण्याचा सल्ला देत आहेत. मेल्याशिवाय स्वर्ग मिळू शकत नाही अशी म्हण आहे, त्याचप्रमाणे वाचनाशिवाय आंतरिक ज्ञान मिळणे शक्य नाही, असे म्हणता येईल. पुस्तके आवश्यक आहेत, कारण त्यांच्यात जी भावना, विचारांची झेप जाणवते ती व्हॉट्सअॅप किंवा फेसबुकवर वाचून किंवा लिहून कधीच सापडत नाही. कधीही नाही. त्यावरील काहीही चांगले नसते, यामुळे नाही, तर ते वाचताना पुस्तकांप्रमाणे गांभीर्य मनात येत नाही म्हणून.
नवनीत गुर्जर navneet@dbcorp.in
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.