आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जीवनमार्ग:चांगल्या संस्कारांची सवय लावा

औरंगाबाद17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ऐन तारुण्याच्या भरात काही लोक खूप गर्विष्ठपणा करतात. म्हातारपण आल्यावर हा बहर वाळवंटात रूपांतरित होईल, हे ते विसरतात. त्यामुळे तारुण्यात शरीराचा वापर अतिशय जपून करा. आजकाल त्याच्या गैरवापराचे सर्वात भयानक दृश्य पाहायला मिळत आहे, ते म्हणजे नशेचे. व्यसन ही मानवाची सहज प्रवृत्ती आहे. तो कोणत्या ना कोणत्या गोष्टीचे व्यसन करणारच. नात्याची, पदाची, पैशाची आणि मेहनतीची नशा चढते, पण दारू, तंबाखू, ड्रग्ज यांची नशा पापासारखी आहे. कारण एवढ्या मादक पदार्थांनंतर पृथ्वी झुलू लागते. मानवी शरीर एक दोरा बनते. परिचित जग अनोळखी होते. किती माणसे आहेत आणि किती प्राणी, हे आपण ठरवू शकत नाही. अहंकार नाहीसा करायचा असेल तर त्याच्याशी भांडू नका, तर प्रेम पसरवा, असे धर्म आणि अध्यात्माच्या क्षेत्रात सांगितले आहे. याचप्रमाणे नशेशी लढू नका, कारण ती एक सहज प्रवृत्ती आहे. त्याची दिशा वळवा. संस्कारांचे व्यसन कराल तर रोम-रोम भरकटण्याऐवजी दरवळू लागेल.

पं. िवजयशंकर मेहता humarehanuman@gmail.com Facebook:Pt. Vijayshankar Mehta

बातम्या आणखी आहेत...