आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जीवनमार्ग:प्राणायामाचा सराव करा

छत्रपती संभाजीनगर17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मानसिक आजारांनी प्रवेश केला तेव्हा लोकांनी लक्ष दिले नाही. मग तो हळूहळू पसरला, तेव्हाही लोक बेफिकीर राहिले. आता त्याचा प्रसार होत आहे. आपल्या देशातील प्रत्येक सहावी व्यक्ती कुठे ना कुठे मानसिक आजाराने ग्रस्त आहे. २१ कोटी लोकांना याचा त्रास होतो असून मानसोपचारतज्ज्ञ ५ हजार आहेत. देशात केवळ दोन हजार क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट आहेत. हा धोका यापुढे नाकारता कामा नये. अयशस्वी लोक मानसिक आजाराने ग्रस्त असतात. इतर भौतिक जीवनाला सर्वस्व मानतात. ते फक्त बाहेरच्या जगात राहतात, असेही म्हणता येईल. आपल्या आतही एक जग आहे, तिथे आत्मा राहतो. चोवीस तासांत आत्म्यासोबत थोडा वेळ घालवा. श्रीरामांनी रावणाचा वध केल्यावर रावण जमिनीवर पडला. रामाचे बाण रावणाचे हात आणि डोके मंदोदरीजवळ सोडून आले. ते बाण परत येऊन रामाच्या भात्यात शिरले. यातून आपण हा बोध घेतला पाहिजे की, आपले प्रयत्न बाहेर असले पाहिजेत, पण थोडा वेळ आत वळले पाहिजे. याला प्राणायाम म्हणतात, मानसिक आजारावर हा स्वस्त इलाज आहे.

पं. िवजयशंकर मेहता humarehanuman@gmail.com Facebook:Pt. Vijayshankar Mehta

बातम्या आणखी आहेत...