आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जीवनमार्ग:मुलांच्या चांगल्या प्रकारे संगोपनाची तयारी करा

औरंगाबाद11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तंत्रज्ञानाच्या या युगात येणाऱ्या काळात काही गोष्टी अतिशय वेगाने बदलून नवे रूप धारण करतील. आपली मुले या बदलातून जातील. हे बदल स्कोप, परफेक्शन, डायमेन्शन, स्पीड, टर्ब्युलन्स आणि सिंगल युनिट फॅमिली असे असतील. या सहा गोष्टी आपल्या आयुष्यात नव्या पद्धतीने प्रवेश करणार आहेत. म्हणून मुलांच्या संगोपनाची तयारी करा, कारण मुले त्या गोष्टी जगतील. या गोष्टी त्यांच्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग बनतील. आता घरातील आणि बाहेरच्या जगात वागण्याबाबत विशेष काळजी घ्यावी लागेल. आपण कामावर असताना आपण प्रथम लोकांना सुधारतो, नंतर त्यांना स्वीकारतो, पण घरात उलटे घडते. येथे तुम्ही प्रथम स्वीकार करा, नंतर दुरुस्त करा. एक्सचेंज ऑफर घरांमध्ये नात्यात काम करत नाही. ईश्वराने जी नाती आयुष्यात आणली आहेत, ती कायम राहतील. त्यामुळे थोडे सावध राहा. पालकांमध्ये काही तणावाचे वातावरण असेल तर त्याची किंमत मुले नक्कीच मोजतील. आता मुलांच्या संगोपनात फक्त त्यांचे शिक्षण, जेवण, कपडे याकडे लक्ष देऊ नये. त्यांच्या आयुष्यात येणाऱ्या सहा गोष्टी त्यांच्या पद्धतीने तयार कराव्यात. केवळ अशांतता आणि एकल कुटुंब याविषयी बोलायचे झाले तर त्यासाठी मुलांना मानसिकदृष्ट्या तयार करा, नाही तर हे दोन स्फोट असे घडतील की त्यात उरलेल्या चार गोष्टीही उडून जातील.

पं. िवजयशंकर मेहता humarehanuman@gmail.com Facebook:Pt. Vijayshankar Mehta

बातम्या आणखी आहेत...