आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा‘लॉकडाऊन’ हा शब्द पुन्हा ऐकावा लागेल, हे विसरू नका. पण, यंदा त्याचा संबंध कोविडशी नसून उन्हाळ्याच्या कहराशी असेल. शास्त्रज्ञांनुसार, उन्हाळ्याचा हंगाम असा कहर करेल की, इच्छा नसतानाही ‘लॉकडाऊन’ करावे लागेल. हा लॉकडाऊन म्हणजे शरीराला उष्णतेपासून वाचवणे. आणि उष्मा एवढा तीव्र असेल तर सर्व काळजी घेतल्यानंतर एकच खबरदारी घ्यावी लागेल की घरातून बाहेर पडू नये, कामाच्या ठिकाणी ऊन व उष्माघात टाळावा. हिंदू कॅलेंडरचा दुसरा महिना सुरू झाला, त्याला वैशाख म्हणतात. उन्हाळा दार ठोठावत आहे व ज्येष्ठ येईपर्यंत लॉकडाऊनचा अर्थ समजेल. वैशाखाचा संबंध सूर्याशी आहे. या दरम्यान पाण्याचे दान, आदर आणि पान करा. हा या महिन्याचा मुख्य उपक्रम असावा. सूर्यकिरणे शरीराची सहनशक्ती कमकुवत करतील. हा निसर्गाचा क्रम आहे. तो मान्य करावाच लागेल. त्यामुळे येत्या दोन महिन्यांसाठी तयारी करायला हवी. शरीर आणि मन थोडं थंड ठेवा, कारण निसर्ग आग ओकण्याच्या तयारीत आहे. पं. िवजयशंकर मेहता humarehanuman@gmail.com Facebook:Pt. Vijayshankar Mehta
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.