आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दृष्टिकाेन:जग मुक्त विचार स्वीकारतेय, आपणही तसे केले पाहिजे

2 महिन्यांपूर्वीलेखक: ​​​​​​​प्रीतीश नंदी
  • कॉपी लिंक
  • लोकांना योग्य आणि अयोग्य यातील भेद शिकवण्यासाठी बंदी आणि सेन्साॅरशिप हेच एकमेव मार्ग नाहीत.

मुलांसाठी काय चांगले आहे, ते आपल्यालाच कळतं हे सिद्ध करण्याचा आटापिटा करणाऱ्या कठोर, शीघ्रकोपी पालकांसारखी आपली सत्ता असावी? की मुलांचे स्वातंत्र्य जपत, त्यांना वाढू देत आणि कधी-कधी चुकांमधून शिकण्याची संधी देणाऱ्या समजूतदार, दयाळू पालकांसारखी ती असावी? याचा निर्णय प्रत्येक सरकारने केलाच पाहिजे.

क्रिप्टो करन्सीवरील बंदीने मुक्त पर्यायावर गदा आली आहे. एका अहवालानुसार, जवळपास एक कोटी भारतीयांकडे १० हजार कोटी मूल्याची डिजिटल संपत्ती आहे. क्रिप्टो करन्सीच्या काळ्याबाजाराने त्यांचे नुकसान होऊ शकते. यापूर्वीही जेव्हा केव्हा एखाद्या गोष्टीवर बंदी आली, तेव्हा असेच झाले आहे. उदाहरणच घ्यायचे तर दारूबंदीचे घ्या. दारूबंदीमुळे तिची तस्करी आणि विषारी दारूने मृत्यू वाढले. लाॅटरी, कॅसिनो वा क्रिकेटवरील सट्टा आदी बेकायदा गोष्टींवर अनेक राज्यांत बंदी आहे. तरीही आज इंटरनेटवर लाॅटरीचा सुकाळ आहे. क्रिकेटवरचा सट्टा ४ लाख कोटींपर्यंत वाढला आहे. ही रक्कम जवळपास आपल्या संरक्षण खात्याच्या बजेटएवढी अाहे.

गमतीची गोष्ट अशी की आज ज्यावर बंदी आहे, तिला उद्या चांगले मानले जाऊ शकते. सरकारे बदलतात, तसे चांगले आणि वाईट याविषयीची धारणाही अनेकदा बदलते. रहस्यमय सातोशी नाकामोटोचा २००९ मधील एक शोध काही वर्षांतच वैश्विक मुद्रा म्हणून पुढे येतो. एका बिटकाॅइनची किंमत आज ३७ लाख रुपये आहे. कोणाला आरबीआयची क्रिप्टो करन्सी हवी आहे? बिल्कुल नाही. त्यामुळे याचा शोध लावण्याचा उद्देशच नष्ट होईल. म्हणजे निनावी वा स्वायत्त राहून ब्लाॅकचेन मायनिंग करणे. दुसरीकडे, दारू ही सरकारची जुनी शत्रू. दारूतून मिळणारा महसूल आणि कर खूप मोठा आहे. २०२० मध्ये ही रक्कम १७५ अब्ज रुपये होती. काही राज्यांत गुटखा आणि पानमसाला यावर हास्यास्पद बंदी आहे. दोन्हीही सहजपणे मिळतात.

सेन्साॅरशिप याहून वेगळी नाही. आजकाल कोणतीही बाब दीर्घकाळ सेन्साॅर राहत नाही. प्रत्येक गोष्ट इंटरनेटमुळे पुढे येतेच. एकेकाळी सेन्साॅरशिप ही बंदीपेक्षा वाईट होती. आणीबाणीचाच काळ घ्या. वृत्तपत्रांतील मथळे अदृश्य होत असत. व्यंगचित्रे हटवली जायची. या काळात सेन्साॅर बोर्डाला ‘किस्सा कुर्सी का’ या बी ग्रेड चित्रपटात ५१ कट हवे होते. इतके होऊनही इंदिरा गांधी समाधानी नव्हत्या. त्यांनी त्याची प्रिंटच जाळली. हा वेडेपणा होता. त्याने चित्रपटाला वारेमाप प्रसिद्धी मिळाली. निर्माता अमृत नाहटा हीरो झाला.

काश्मीर आणि दिल्लीतील काही भागात इंटरनेट शटडाऊन केल्याने जगाचे लक्ष विनाकारण याकडे खेचले गेले. येथे लोकशाही वा हुकूमशाहीचा संबंध नाही. हा सत्तेचा विषय आहे. तुम्ही सरकारला आपली शक्ती वापरू द्याल, तर सरकार तो करेलच. तुम्ही पूर्णपणे कोसळून जात नाही, तोवर काहीही करू शकत नाही, जसे मुलं आपल्या आई - बाबाशी करतात. आपले आई - बाबा वाईट आहेत, म्हणून ते तसे वागतात असे नाही, तर त्यांच्यासाठी त्या वेळी स्वातंत्र्य ही अधिक महत्त्वाची बाब असते.

भारतात आपण बहुतेक वेळा समजतो की मुले नेहमी चुकीचे आणि आई - वडीलच काय ते गुणांची खाण असतात. बाॅलीवूडने आणि आपल्या लोककथांनीही निर्माण केलेली आदर्श प्रतिमा जपण्याशिवाय आई-वडिलांसमोर पर्याय नसतो. खरे तर त्यांनी आपल्या मनाप्रमाणे जगले पाहिजे. मुलांच्या स्वातंत्र्याचा विचार न करता आदर्श मुलाची अपेक्षा केली जाते. परिणाम? अधिक विखुरलेली कुटुंबं आणि अधिक वेडेपणा.

खरे स्वातंत्र्य आई-वडील आणि मुलांनी एकमेकांवर प्रेम करत आणि आदर ठेवत मिळून मिसळून राहण्यात आहे. जिथे नव्या गोष्टी करताना, चुका घडताना, जीवनाचा शोध घेताना एकमेकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहातात. हीच गोष्ट सरकार आणि नागरिक यांच्याही बाबतीत खरी आहे. त्यांनी एकमेकांच्या मूर्खपणासह एकत्र राहायला शिकले पाहिजे. दडपून टाकणे, दमन करणे हा काही उपाय नाही. लोकांना योग्य आणि अयोग्य यातील भेद शिकवण्यासाठी बंदी आणि सेन्साॅरशिप हेच एकमेव मार्ग नाहीत. बंदी असलेली अनेक पुस्तके आणि चित्रपट आज क्लासिक मानले जातात. आजची नवी पिढी कधी काळी नाकारण्यात आलेल्या गोष्टींतून नवीन गुणांचा शोध घेऊ लागली आहे. जग मुक्त होत आहे. आपणही तसेच करण्याची हीच वेळ आहे.

बातम्या आणखी आहेत...