आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआ पले शिक्षण, अनुभव आणि सामाजिक आधार...हे सर्व आपल्यासोबत असतील आपण यशाची शिडी चढू शकतो, पण तरीही मर्यादा असेल. हे सर्व आपल्याला एका मर्यादेपर्यंत पोहोचवू शकतात, पण त्यापलीकडे फक्त आपले चारित्र्य, सद्गुण आणि विश्वासार्हताच आपल्याला घेऊन जाऊ शकते. ५०० महापुरुषांच्या जीवनाचा अभ्यास करा. सध्या येणाऱ्या बातम्या बघा आणि वाचा. नैतिकतेच्या किंवा विश्वासार्हतेच्या अभावामुळे एखाद्या व्यक्तीला पदावरून दूर करावे लागले, तर कोणी परदेशात पळून गेल्याचे दर दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी वाचायला मिळते. जीवनात नीती, आचार, नियम आणि तत्त्वे कधीही सोडू नका. कामानंतर येतो माणसांशी संबंध. अमेरिकन लेखक आणि व्यवस्थापन गुरू ऑगस्ट मँडिनो म्हणतात की, व्यवसायातील आपली ९०% वाढ आपल्या मानवी संबंधांवर अवलंबून असते. हार्वर्ड विद्यापीठात दहा हजार लोकांचे सर्वेक्षण करण्यात आले. आपले शिक्षण, अनुभव आणि कला आपल्या प्रगतीला केवळ १५ टक्के मदत करू शकतात, हे त्यातून समोर आले. आपल्या उर्वरित ८५ टक्के प्रगतीचे कारण म्हणजे आपले लोकांशी असलेले मानवी नाते. आपल्या वर्तनात नेहमी नम्रता आणि विवेक असावा.
एक किस्सा आहे. कोणी तरी प्रमुख स्वामी महाराजांना पत्र लिहिले. त्यात तुम्ही ‘आय ब्लेस यू’ असे लिहावे, अशी माझी इच्छा आहे, असे त्यांनी आवर्जून सांगितले. स्वामी महाराज एक अक्षर लिहू शकत होते, पण पूर्ण वाक्य लिहिण्यासाठी कोणाची तरी मदत हवी होती. त्यांनी फक्त इंग्रजीत ‘आय’ लिहिले... बाकीचे वाक्य सहकाऱ्याने लिहिले. स्वामीजींनी आय स्माॅलमध्ये, तर उर्वरित वाक्य कॅपिटलमध्ये लिहिले होते. इंग्रजी व्याकरणानुसार ते चुकीचे होते. त्यांना याचे कारण विचारले असता स्वामीजी म्हणाले की, ‘मी’ आयुष्यात नेहमीच लहान असायला हवा. संपूर्ण ब्रह्मांडात आपले अस्तित्व धुळीच्या कणाएवढेही नाही.
जीवनात दृष्टिकोनदेखील खूप महत्त्वाचा आहे. अमुक काम शक्य नाही, ते मी कसे करणार, अशा दृष्टिकोनाने सकाळपासून बसलो तर धावणे तर सोडा, नीट चालताही येणार नाही. दुसरा कोणी ते काम करू शकतो, तर आपण का करू शकत नाही? आपला योग्य दृष्टिकोन कोणत्याही परिस्थितीला आपल्यासाठी फायदेशीर परिस्थितीत बदलू शकतो. आपली हजारो प्रकारची ऊर्जा ती न वापरता वाया जाते, कारण आपला दृष्टिकोन योग्य नसतो. तथापि, आपल्या आतही निद्रिस्त ऊर्जा असते.
भारताने १९८३ मध्ये कपिलदेव यांच्या नेतृत्वाखाली विश्वचषक जिंकला होता. भारतासाठी ही एक विलक्षण कामगिरी होती, कारण ती पहिली आंतरराष्ट्रीय ट्रॉफी होती. त्या वेळी वेस्ट इंडीज हा खूप शक्तिशाली संघ मानला जात होता. वेस्ट इंडीजचा संघ हरला, कारण त्यांची वृत्ती अतिआत्मविश्वासाची होती. त्यांनी भारतीय संघाला कमकुवत मानले. विश्वचषकानंतर वेस्ट इंडीजचा संघ एकदिवसीय आणि कसोटी मालिका खेळण्यासाठी भारतात आला होता, पण त्यानंतर वेस्ट इंडीजने भारतीय संघाचा पराभव केला. भारतीय संघावर प्रश्न उपस्थित केले गेले. माध्यमांनी टीका सुरू केली. आता दृष्टिकोन बदलण्याची पाळी भारतीय संघाची होती. खेळाडूंचे समुपदेशन सुरू झाले. संघाचा सलामीवीर सुनील गावसकरला बचावात्मक खेळण्याऐवजी आक्रमक खेळ करण्यास सांगण्यात आले. यानंतर संघाच्या कामगिरीत चमत्कारिक सुधारणा होऊ लागली.
डॉ. ज्ञानवत्सल स्वामी प्रेरक वक्ते
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.