आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Opinion
  • Putin's Threat To Cut Off Gas Supplies Sparks Outrage, Russian Government Raises Ruble, | Marathi News

निर्बंध झाले सैल:गॅस पुरवठा बंद करण्याच्या पुतीन यांच्या धमकीने खळबळ, रशियन सरकारने रुबल सावरला, तरीही देश आर्थिकदृष्ट्या एकाकी

पॅट्रिशिया कोहेन4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यानंतर अमेरिका, युरोपियन युनियन आणि त्यांच्या मित्र राष्ट्रांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या आर्थिक हल्ल्यामुळे रशियाचे मोठे नुकसान झाले आहे. रशियाला आपले अब्जावधी डॉलर्स वापरता येत नाहीत. त्यांच्या परदेशातील व्यवसायाचा मोठा भाग ठप्प झाला आहे. एक हजाराहून अधिक कंपन्या, संस्था आणि राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या जवळचे लोक आर्थिकदृष्ट्या अडचणीत आले आहत. परंतु, पुतीन यांनी गेल्या आठवड्यात जगाला आठवण करून दिली की त्यांच्याकडेही आर्थिक शस्त्रे आहेत, त्याद्वारे ते समस्या निर्माण करू शकतात किंवा हल्ले निष्फळ करू शकतात. दरम्यान, रशियन सरकार आणि मध्यवर्ती बँकेच्या उपाययोजनांमुळे निम्मी किंमत गमावलेला रुबल हल्लापूर्व स्थितीत परतला आहे.

रशियाकडून युरोपला होणारा गॅस पुरवठा खंडित करण्याच्या धमक्यांमुळे जर्मनी, इटली आणि इतर सहयोगी देशांच्या राजधान्या ढवळून निघाल्या. युद्धानंतर पहिल्यांदाच या देशांना आपली अर्थव्यवस्था चालवण्यासाठी रशियन गॅसची किती गरज आहे हे लक्षात आले आहे. ४८ गैर-मित्र देशांनी निर्बंधांचे उल्लंघन करून रशियन रुबलमध्ये नैसर्गिक गॅसचे पैसे द्यावे, अशी मागणी पुतीन यांनी केली होती. रशियन गॅसवर अवलंबून असल्यामुळे अमेरिका आणि युरोपने रशियावर लादलेल्या कठोर आर्थिक निर्बंधांमधून इंधन खरेदीला सूट दिली आहे. युरोपियन युनियन ४० टक्के गॅस आणि २५ टक्के तेल रशियाकडून खरेदी करते. गेल्या आठवड्यात जर्मन चान्सलर ओल्फ स्कोल्झ यांनी इशारा दिला की, पुरवठा बंद केल्याने देश व पूर्ण युरोप मंदीत जाईल.

सध्या तरी गॅस पुरवठा त्वरित बंद होणार नाही, असे दिसते. मात्र, पुतीन यांनी रुबलमध्ये पैसे देण्याची अचानक मागणी केल्यामुळे जर्मनी, ऑस्ट्रियाने गॅस टंचाईला तोंड देण्याची तयारी सुरू केली आहे. अमेरिकेने युरोपला गॅसचा पुरवठा सुरू केला आहे, पण गरज भागवण्यासाठी तो खूपच कमी आहे. ब्रुसेल्सच्या ब्रुगेल इकॉनॉमिक्स इन्स्टिट्यूटच्या मते, युरोप रशियाकडून दररोज ६५०० कोटी रुपयांचे तेल आणि गॅस खरेदी करतो. गॅझप्रॉम या रशियन ऊर्जा कंपनीने मार्च महिन्यातच गॅस निर्यातीतून ७० हजार कोटी रुपये कमावले आहेत. गेल्या आठवड्यात पुरवठा बंद करून पुन्हा सुरू करण्याच्या पुतीन यांच्या युक्तीने युरोपियन नेत्यांची रणनीती रुळांवरून घसरली आहे. युरोपीय देशांनी पुढील हिवाळ्यापर्यंत रशियन गॅसमध्ये दोनतृतीयांश कपात करण्याचा आणि २०२७ पर्यंत पूर्णपणे बंद करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे, पण तज्ज्ञांच्या मते, हे लक्ष्य खूप महत्त्वाकांक्षी आहे.

गॅस हा मर्यादित स्रोत आहे. पुतीन यांनी पुरवठा बंद केला तर भविष्यात ते या शस्त्राचा फारसा वापर करू शकणार नाहीत. रशियन तेल आणि वायूवरील युरोपचे अवलंबित्व कमी केल्यास त्याचे दूरगामी परिणाम होतील, असे बहुतांश विश्लेषक म्हणतात. युरोपियन कमिशनच्या अध्यक्ष उर्सुला वॉन डेर लेन म्हणाल्या, “आम्ही पुरवठादारावर अवलंबून राहू शकत नाही, तो आम्हाला धमकी देतो.” पूर्वीच्या कराराच्या विरोधात रुबलमध्ये रक्कम देण्याच्या पुतीन यांच्या मागणीमुळे अर्थतज्ज्ञ, वकील व धोरणकर्ते गोंधळले आहेत. युक्रेन युद्धाचा निकाल काहीही लागला तरी रशिया आर्थिकदृष्ट्या एकाकी पडेल. जागतिक अर्थव्यवस्थेवरील त्याचा प्रभाव कमी होईल. © The New York Times

बातम्या आणखी आहेत...