आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मॅनेजमेंट फंडा:गुणवत्ताच निश्चित करते आपले सामाजिक स्थान !

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सुनील शेट्टीने गेल्या दहा वर्षांत अभिनय केला नाही. तो कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सक्रिय नाही. धारावी बँक सिरीजमध्ये तो ६३ वर्षीय व्यक्तीची भूमिका साकारत आहे. वयस्कर दिसण्यासाठी त्याला हा मेकअप करावा लागला. तो स्वत:ही ६२ वर्षांचा झाला आहे. सुनील आपल्या काळात फक्त अभिनयामुळेच फिटनेसबाबत सजग नव्हता तर फिट राहणे त्याची जीवनपद्धती आहे. काही वर्षांपूर्वी अक्षयकुमारने हा मान मिळवला होता. सुनील शेट्टी अक्षयच्या तुलनेत कोणत्याही गोष्टीत मागे नाही. मात्र ब्रँड नेहमीच असे चेहरे निवडतात जे व्यावसायिक जीवनात जास्त सक्रिय असतात. याबाबतीत अक्षय पुढे आहे. अक्षय वर्षातून चार-पाच चित्रपट करतो. त्यामुळे त्याला पहिली पसंती मिळते. सुनीलबाबत सर्वात चांगली गोष्ट ही की, सोशली अॅक्टिव्ह नसतानाही त्याने फिटनेसकडे दुर्लक्ष केले नाही. कार्बोहायड्रेट नियम सिद्धांताचे पालन करत तो हिप मूव्हमेंट-लेग रेजचा सर्वाधिक सराव करतो. ज्या दिवसांत शारीरिक हालचाल कमी असेल त्या वेळी तो जिममध्ये जास्त काळ घालवतो. कर्बाचे प्रमाण कमी करतो. तो दररोज १५ ग्रॅमपेक्षा जास्त साखर खात नाही. तो कोणतेही परदेशी अन्न सेवन करत नाही. त्याचे असे मत आहे की, भारतीय भोजन सर्वोत्कृष्ट आहे. आपल्या जेवणात आरोग्यासाठी सर्वकाही आहे. त्याच्या बाजूचा एखादा भलेही १०० वा ३०० किलो वजन उचलत असेल, तो मात्र नियमित ३० किलो वजनाने दीर्घकाळ सराव करतो. या शिस्तप्रिय जीवनशैलीनेच त्याच्या फिटनेसला आकार दिला आहे.

नाना पाटेकर यांचीही अशीच काहीशी गोष्ट. त्यांनीही पाच वर्षांपासून मोठ्या पडद्यावर भूमिका केली नाही. २०१८ मध्ये काल चित्रपटात रजनीकांतच्या विरोधी भूमिकेत ते दिसले होते. नाना आता अनंत एन. महादेवन यांच्यासह ‘द कन्फेशन’ चित्रपट करत आहेत. त्यात ते नेहमीची रागीट भूमिका साकारणार नाहीत. महादेवन नानांच्या अंतर्मनाचा ठाव घेत आहेत. त्यांच्या भावना अभिनयात उतराव्यात असे त्यांना वाटते. त्यांचे मौन शब्दांपेक्षाही मोठ्या स्वरात बोलेल. मी नानांना वैयक्तिरीत्या ओळखतो. मित्रांसोबत खेळायला जाण्याआधी आपला गृहपाठ पूर्ण करणाऱ्या शाळकरी पोरासारखे ते आहेत. चित्रीकरणानंतर ते रोज पुढच्या दिवसाचे शेड्यूल, दृश्यांबाबत चर्चा करतात. आपल्या संवादाची प्रत घेऊन ते बिछान्यावर जातात. वारंवार वाचतात. दशकांचा अनुभव असूनही एखाद्या नवख्या कलाकारासारखी त्यांची वर्तणूक असते. कलेबाबत त्यांचे असलेले प्रेम यातून लख्खपणे दिसून येते. केवळ एका महिन्यात नोव्हेंबर ते डिसेंबरदरम्यान महादेवन आणि नानाने गोव्यात चित्रपट पूर्ण केला. एवढे वरिष्ठ असूनही दिग्दर्शक सतत नानांच्या समर्पणाचे कौतुक करतात. चित्रपटात नानांचा ५० ते पंचाहत्तरी असा प्रवास आहे. ते १ जानेवारीला ७२ वर्षांचे होतील. अमिताभ बच्चन, रजनीकांत आणि अक्षयकुमार यासारख्या सदाबहार अभिनेत्यांमध्ये एक गोष्ट सारखी आहे, ती म्हणजे त्यांची शिस्तप्रियता आणि चांगल्या गुणांवरील विश्वास.

फंडा असा की, जर तुमच्याकडे काही खास गुण असतील आणि तुम्ही त्यांच्याशी तडजोड करत नसाल तर जग स्वत:हून त्यांचे ब्रँडिंग करते. आपल्या गुणांवर कायम अढळ असणारी व्यक्ती जीवनात कधीच अपयशी ठरत नाही.

एन. रघुरामन, मॅनेजमेंट गुरू [raghu@dbcorp.in]

बातम्या आणखी आहेत...