आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराडब्ल्यूएचओच्या घटनेतील कलम १ हे जगातील प्रत्येक व्यक्तीला शक्य तितके सर्वोत्तम आरोग्य प्रदान करण्याचे उद्दिष्ट देते आणि कलम २ जगातील सरकारे, तज्ज्ञ एजन्सींना समन्वय साधण्यासाठी व महामारीचा अंत करण्यासाठी प्रयत्नांना गती देण्याचे आवाहन करते. जगाला कोरोनाची माहिती मिळून दोन महिने उलटूनही चीनच्या दबावाखाली संस्थेने प्रवासी बंदीचा सल्ला देण्यास आणि कोविड-१९ ला महामारी म्हणून घोषित करण्यास विलंब केला. संस्थेच्या महासंचालकपदाच्या निवडणुकीत चीनने अन्य देशांची मते मिळवण्यात मदत केल्याचा आरोप करण्यात आला होता. २००३ मध्ये त्याच अधिकाराखाली माजी महासंचालकांनी केवळ चीनच नव्हे, तर अनेक देशांना महामारीच्या नियमांचे पालन करण्यास भाग पाडले आणि महामारी पूर्णपणे थांबली. कोरोनाचा प्रसार रोखण्यात किंवा लसीच्या शोधातही संस्थेची भूमिका नव्हती. संस्थेकडे विषाणू व्हेरिएंटची ग्रीक नावे ठेवण्याव्यतिरिक्त कोणताही प्रभावी प्रतिबंध सल्ला नव्हता.
अशा परिस्थितीत अमुक देशात या महामारीत किती मृत्यू झाले हे सांगणे म्हणजे संस्था मूळ कार्यापासून दूर जात आहे. भारतातील अधिकृत आकड्यांपेक्षा दहापट अधिक मृत्यूंचा आधार ही माध्यमे/वेबसाइटच्या बातम्या आहेत, असे संस्थेनेच कबूल केले, तेव्हा तिच्या वैज्ञानिक विचारावर प्रश्नचिन्ह उभे केले जाते. केवळ १७ राज्यांच्या अहवालाच्या आधारे सर्व राज्यांचे आकडे निश्चित करणे ही चूक आहे, कारण या महामारीमुळे मृत्यू झालेल्या लोकांची टक्केवारी प्रत्येक राज्यात वेगळी आहे. यापूर्वी किती जणांचा मृत्यू झाला हे सांगण्याऐवजी संस्थेने ‘आता मृत्यू नको’ याची चिंता करावी.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.