आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कशासाठी? फोटोसाठी..!:राखोळी वाला...

प्रियंका सातपुते2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिवेलागणीच्या वेळेला मी गावाकडे निघाले होते. तेवढ्यात रस्त्याने घराकडे येणारा गुराखी दिसला. रस्ता अरुंद असल्याने जनावरं बाजूला घेण्यास त्याला जरासा वेळ लागला, परंतु हॉर्न वाजवायच्या आतच त्यानं विशिष्ट आवाज काढत जनावरं बाजूला घेतली. मी फारसं लक्ष न देता गाडी हळूच बाजूला घेऊन घरी आले. आमच्या घराच्या बाजूलाच गुरांचा गोठा होता. पण, गुरं दिसली नाहीत, म्हणून मी शेजारच्या नानांना विचारलं तर ते म्हणाले, “राखोळीवाला गुरं चरायला घेऊन गेलाय.’ मी ‘राखोळी’ हा शब्द पहिल्यांदाच ऐकला. त्याचा अर्थ विचारला तर नाना म्हणाले, की खेड्यात काहींकडे भरपूर, काहींकडे थोडीफार तर काहींकडे शेती नसते. तसंच गुरांचंही आहे. काही लोकांकडे गुरं असतात, पण सांभाळायला माणसं नसतात. काही जण दुसऱ्यांच्या शेतावर काम करतात, काही जण गावातील गुरं दिवसभर चरायला घेऊन जातात आणि सायंकाळी ज्याच्या त्याच्या घरी आणून सोडतात. त्या मोबदल्यात गुरांच्या संख्येप्रमाणे दर महिन्याला पैसे मिळतात. त्याचही भागतं, आपलीही अडचण दूर होते. यालाच राखोळी म्हणतात.

दुसऱ्या दिवशी राखोळीवाला ऊन लागू नये म्हणून रस्त्याच्या कडेला असलेल्या मोठ्या पाइपच्या खाली बसून गुरं चारताना दिसला आणि मी हा फोटो क्लिक केला. आज गायरान राहिले नाही. नवीन तंत्रज्ञान विकसित झाल्याने शेतकरी आधुनिक शेतीबरोबरच बंदिस्त पशुपालनाकडे वळाला आहे. त्यामुळं गावात आता पूर्वीसारखा राखोळीवाला कुठं दिसत नाही.

{संपर्क : priyankasatpute45@gmail.com

बातम्या आणखी आहेत...