आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठरवले असते तर संजय राऊत खासदार झालेच नसते, असे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले. मला खुर्चीपेक्षा माझा धर्म महत्त्वाचा आहे, असा दावाही त्यांनी केला.
लव्ह जिहादविरोधात कायद्याच्या मागणीसाठी शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. तेथे पाटील म्हणाले की, शिंदे यांनी दाढीवर नुसता हात ठेवला असता (पाडण्याचा इशारा केला असता) तर राऊत आडवे झाले असते. पण शिंदेंनी दाढीवर हात फिरवला नाही. म्हणूनच राऊत खासदार झाले. लोक आमच्या हिंदुत्वावरील िनष्ठेविषयी बोलतात.
पण मला खुर्चीपेक्षा माझा धर्म महत्त्वाचा आहे, आधी आम्ही हिंदू आहोत, मग मंत्री आहोत. खुर्ची देणारी जनता खुर्ची काढूनही घेते. आम्ही कुणाच्या धर्माला दुखवत नाही. पण आमच्या धर्माबाबत कुणी वाकडी नजर करत असेल तर आम्ही त्याला सोडणार नाही, असे पाटील यांनी सांगितले. इस देश में रहना होगा तो वंदे मातरम् कहना होगा, अशी घोषणा देताना त्यांनी एमआयएमच्या आमदाराविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.