आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Opinion
  • Ravish Kumar... From Sorting Letters To Getting Ramon Magsaysay... Has Followers... Trollers Too

चर्चेतील व्यक्तिमत्त्व:रवीश कुमार... पत्रांची वर्गवारी ते रॅमन मॅगसेसे मिळण्यापर्यंत... यांना अनुयायीही... ट्रोलर्सही

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जन्म : ५ डिसेंबर १९७४ जितवारपूर, बिहार शिक्षण : एमए, दिल्ली विद्यापीठ कुटुंब : पत्नी नयना दासगुप्ता, दोन मुली प्रमुख पुरस्कार/सन्मान : उत्कृष्ट पत्रकारितेसाठी दोन वेळा रामनाथ गोयन्का अवॉर्ड मिळाला (२०१३, २०१७), रॅमन मॅगसेसे अवॉर्डने (२०१९) सन्मानित

‘नमस्कार! मैं रवीश कुमार.’ प्राइम टाइमचा हा आवाज तुम्हाला यापुढे एनडीटीव्हीवर ऐकू येणार नाही. टीव्हीच्या हिंदी पत्रकारितेतील प्रसिद्ध चेहरा रवीश कुमार यांनी एनडीटीव्हीचा राजीनामा दिला आहे. विशेष म्हणजे अदानी समूह एनडीटीव्हीच्या अधिग्रहणाच्या जवळ पोहोचला आहे. रवीश कुमार यांना प्रतिष्ठेचा रॅमन मॅगसेसे पुरस्कार मिळाला आहे, त्याला आशियातील ‘नोबेल’ म्हटले जाते. रवीश आता त्यांच्या यूट्यूब चॅनलद्वारे प्रेक्षकांशी संवाद साधणार आहेत. रवीश फक्त पत्रकार किंवा अँकर नाहीत... रवीश यांनी अनेक पुस्तकेही लिहिली आहेत. यात ‘द फ्री व्हॉइस : ऑन डेमोक्रसी, कल्चर अँड द नेशन’, ‘बोलना ही है’, ‘इश्क में शहर होना’, देखते रहिए... ही प्रमुख आहेत.

आउटलूकला दिलेल्या मुलाखतीत रवीश यांनी त्यांच्या प्रारंभाबद्दल सांगितले. ते म्हणाले, ‘एक दिवस मला राधिका रॉय यांचा मेल आला की, रिपोर्टिंग करायचे आहे का? मग मी मेहमूद फारुकी यांना माझ्या वतीने उत्तर लिहायला सांगितले… माझे वाईट इंग्रजी पाहून त्यांचे (राधिका) मत बदलेल, अशी भीती मला वाटत होती. रवीश यांनी मुलाखतीत सांगितले होते की, माझे पूर्ण नाव रवीशकुमार पांडे… पण मी गावात जातिभेद जवळून पाहिला… म्हणूनच आडनाव काढून टाकले. रवीश यांचे सोशल मीडियावर फॉलोअर्सही आहेत, त्यामुळे त्यांना खूप ट्रोलही केले जाते. आज जाणून घ्या टीव्हीचा प्रसिद्ध चेहरा रवीशकुमार यांच्याबद्दल.

रवीशकुमार यांनी नुकताच एनडीटीव्हीचा राजीनामा दिला आहे. आता ते त्यांच्या यूट्यूब चॅनलद्वारे पत्रकारिता करणार आहेत. प्रारंभिक जीवन : कुटुंबाच्या विरोधात जाऊन प्रेमविवाह रवीशकुमार यांचा जन्म बिहारमधील मोतिहारी जिल्ह्यातील जितवारपूर या छोट्याशा गावात झाला. पाटणा येथील लोयोला हायस्कूलमध्ये त्यांनी शालेय शिक्षण घेतले. यानंतर त्यांनी दिल्ली विद्यापीठाच्या देशबंधू महाविद्यालयातून इतिहासात बीए आणि नंतर एमए केले. महाविद्यालयीन शिक्षणादरम्यान येथेच त्यांची भेट नयन दासगुप्ता यांच्याशी झाली. नयना मूळच्या बंगालच्या आहेत. नयना यांना सुमारे सात वर्षे डेट केल्यानंतर रवीश यांनी त्यांच्याशी लग्न केले. तथापि, हे लग्न सोपे नव्हते. या आंतरजातीय विवाहामुळे दोघांच्या कुटुंबीयांनी बराच विरोध केला. सध्या दोघांना दोन मुली आहेत. नयना लेडी श्रीराम कॉलेजमध्ये इतिहास शिकवतात. रवीश यांचा छोटा भाऊ ब्रिजेश पांडे राजकारणी आहे.

करिअर : चॅनलमध्ये अनुवादकापासून कार्यकारी संपादक झाले रवीशकुमार १९९६ मध्ये एनडीटीव्हीला जॉइन झाले. आउटलूक मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितले की, कॉलेजच्या अभ्यासादरम्यान त्यांना एनडीटीव्हीमध्ये रोजच्या नोकरीबद्दल माहिती मिळाली. दूरदर्शनवरील गुड मॉर्निंग इंडिया शोसाठी येणाऱ्या पत्रांची क्रमवारी लावणे हे त्यांचे काम होते. काही महिन्यांनी अनुवादकाची नोकरी मिळाली. दरम्यान, एनडीटीव्ही इंडिया लाँच झाला आणि काही दिवस डेस्कवर काम केले. नंतर त्यांची आवड पाहून राधिका रॉय यांनी एकेदिवशी विचारले की, तुला रिपोर्टिंग करायला आवडेल का? रिपोर्टिंगची सुरुवात अशी झाली. ‘रवीश की रिपोर्ट’ शोमधून मोठी ओळख मिळाली. ‘प्राइम टाइम विथ रवीश’मध्ये पूर्णवेळ अँकरिंग सुरू केली. ‘हम लोग’ आणि ‘देस की बात’ सारखे कार्यक्रमही गाजले. सोडताना ते एनडीटीव्हीचे वरिष्ठ कार्यकारी संपादक होते.

विशेष : यांच्यावरील माहितीपटाला टोरंटोत पुरस्कार मिळाला {त्यांच्यावर ‘व्हाइल वुई वॉच्ड’ हा माहितीपट बनवण्यात आला आहे. सप्टेंबर २०२२ मध्ये टोरंटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात त्याला पुरस्कार देण्यात आला. {त्यांच्या कार्यक्रमांदरम्यान त्यांनी अनेक वेळा प्रेक्षकांना टीव्हीवरील बातम्या न पाहण्याचे आवाहन केले. बहुतांश टीव्ही बातम्या पक्षपाती असल्याचे त्यांनी म्हटले. {रवीश यांनी सांगितले की, रिपोर्टिंगमुळे त्यांना अनेकदा जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. अनेकदा ते मार्ग बदलून घरी जातात. {विरोधकांच्या सततच्या ट्रोलिंगमुळे त्यांनी काही काळ ट्विटर अकाउंट बंद केले होते. {वर्ष २०१९ मध्ये रॅमन मॅगसेसे पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार देणाऱ्या संस्थेने त्यांना ‘व्हॉइस ऑफ द व्हाइसलेस’ असे संबोधले. {रवीश कुमार यांनी ‘इश्क में शहर होना’, ‘देखते रहिये’, ‘फ्री व्हाॅइस’ यांसारखी लोकप्रिय पुस्तके लिहिली आहेत.

बातम्या आणखी आहेत...