आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कंडिशनिंग तंत्र:रामचरित मानस वाचल्यास जीवनात मदतच होईल

औरंगाबाद12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

घाईत असाल, ्वभावात अधीरता येत असेल, तर रामचरित मानसमधील काही दोह्यांचे रोज पाठ करावेत. मानसशास्त्रज्ञ ऋषी तुलसीदासांनी या ग्रंथाची रचना अशा अनोख्या पद्धतीने केली आहे की, तो थोडा वेळ वाचल्यावर आपण आतल्या आत थांबल्याचे जाणवते. अधीरतेला हा ग्रंथ जणू शोषूनच घेतो. आज तुलसीदास जयंतीच्या दिवशी त्यांचे यासाठीही स्मरण केले पाहिजे, कारण त्यांचे रामचरित मानस विद्यार्थ्यांना खूप उपयोगी पडेल. आजकाल मानसशास्त्रज्ञ शास्त्रीय कंडिशनिंग तंत्र वापरून मुलांना वाचायला शिकवतात. यात अशी पद्धत आहे की, एखादा चॅप्टर घेतला जातो तेव्हा प्रथम त्याचा परिचय, नंतर शीर्षक-उपशीर्षक आणि नंतर सारांश वाचतात. पत्रकारितेतही हे शिकवले जाते. रामचरित मानसमध्ये तुलसीदासांनी प्रत्येक कांडातील प्रसंग या चार प्रकारे लिहिले आहेत. एखाद्या विद्यार्थ्याने रामचरितमानसचे काही दोहे आणि चौपाया दररोज वाचल्या तर त्याला त्याच्या विषयाची तयारी करणे खूप सोपे होईल, कारण मानसशास्त्रज्ञ आज जी पद्धत सांगत आहेत ती पद्धत तुलसीदासांनी खूप पूर्वी लिहून ठेवली आहे.

बातम्या आणखी आहेत...