आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनंत ऊर्जा:खऱ्या बदलाची सुरुवात स्वतःपासून होते

मुंबई9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रसिद्ध लेखक स्टीफन कोवे एका ठिकाणी एकदा म्हणाले होते, “मनुष्य जोपर्यंत आतून बदलत नाही तोपर्यंत बाह्य बदल त्याच्यासाठी व्यर्थ ठरतील.” माणसाचा आंतरिक बदल म्हणजे त्याची विचारसरणी-दृष्टिकोन यात बदल करणे! आपल्या विचारात अर्थपूर्ण बदल करणे! शांतता हा मानवाचा अंगभूत घटक आहे. म्हणून आंतरिक शांततेसाठी आंतरिक बदल आवश्यक आहे.

बदल हा जगाचा नियम आहे. आपले डोळे दररोज या बदलाचे साक्षीदार होत असतात. मानवाचा जन्म, विकास आणि मृत्यू हे या बदलाचेच प्रतिबिंब आहेत. सूर्य - चंद्राचे उगवणे - मावळणे, फुले उमलणे -कोमेजणे इ. निसर्गातील बदलाबरोबरच मानवाने आपल्या आनंदासाठी आणि सोयीसाठी अनेक कृत्रिम बदलही केले आहेत. वैज्ञानिक शोधांमुळे आज माणूस जितक्या सहजपणे आकाशात फिरू शकतो, तितक्याच सहजतेने तो समुद्राच्या खोलीलाही स्पर्श करू शकतो. १० सें.मी. दूर बसलेल्या व्यक्तीशी सहज बोलता येते, त्याचप्रमाणे दहा हजार किमी दूर बसलेल्या व्यक्तीशी बोलणे आज सोपे झाले आहे. खरे तर या बदलांमागील माणसाचे मुख्य उद्दिष्ट जीवनात शांततेने जगणे हे होते. पण, आज माणूस खरंच शांत आहे का? या बदलांमुळे जगात गतिशीलता आणि सुविधांची भर पडली, परंतु यामुळे स्थिरता आणि शांततेचा वियोगही झाला. नोबेल पारितोषिक विजेते कवी टी. एस. इलियट म्हणतात, ‘अनंत शोध, अंतहीन प्रयोग गतीचे ज्ञान देतात, स्थिरतेचे नाही. म्हणजे बाह्य वस्तू, वागणूक, वातावरण आणि वेशातील बदल केवळ गती देऊ शकतात, स्थिरता-शांतता नाही! केवळ बाह्य बदलांवर विश्वास ठेवणाऱ्यांना सावध करत कबीर म्हणतात- बांबी कूटे बांवरा सर्प न मार्या जाई| मूर्ख बांबी न डंसे सर्प सबनकुं खाई||

सापाच्या बिळावर हजारो काठ्या मारल्या तरी आत दडलेल्या सापाला काहीही होणार नाही. येथे मुख्य उद्देश विषारी सापाचा नाश करणे हा होता, परंतु केवळ बाह्य-वरवरच्या प्रयत्नांमुळे तो उद्देश पूर्ण होऊ शकत नाही. सारखीच शैक्षणिक आणि बौद्धिक पात्रता असलेल्या दोन मित्रांपैकी एकाचा पगार अचानक वाढला तर दुसऱ्या मित्राला कोणता बदल शांतता देईल? पगार वाढवून की ठोस आंतरिक समज अंगीकारून? पहिला बदल कायमस्वरूपी किंवा त्याच्या नियंत्रणात नाही, हे स्पष्ट आहे. शिवाय, या बदलाला मर्यादा नाही; आज एखाद्या मित्राची प्रगती बघून, तर उद्या आणखी काही प्रतिकूलतेबद्दल आपण अस्वस्थ होत राहू. त्यामुळे आपल्या विचारात बदल घडवून आणला पाहिजे.

महापुरुषांचे हेच वैशिष्ट्य आहे. सर्वांसाठी शांततेचे अंतिम ध्येय ठेवून ते स्वतःला साचेबद्ध करतात. याच भावनेतून प्रमुख स्वामी महाराजांनी आयुष्यभर प्रवास केला. १९ फेब्रुवारी १९७५ रोजी प्रमुख स्वामी महाराज गुजरातमधील आनंद शहरात होते. दुपारी एका भक्ताकडे भंडारा होता. प्रमुख स्वामी महाराज आणि इतर संत-भक्तही पंक्तीत बसले होते. ताटात पदार्थ वाढण्यात आले. प्रार्थना चालू असताना अचानक एक गृहस्थ आले, “स्वामीजी! माझे घर राहिले.’ तेव्हा तिथे उभे असलेले व्यवस्थापक म्हणाले, ‘तुमच्या घरी जाऊन आलो. मीच स्वामीजींना तिथे घेऊन गेलो होतो.’ गृहस्थ म्हणाले, “पण त्या वेळी मी घरी नव्हतो. त्यामुळे पुन्हा या.’ वेळ, योगायोग आणि कारण या तिन्ही बाबतीत त्या गृहस्थाचा हट्टीपणा चुकीचा होता. त्याने हट्ट करू नये म्हणून प्रशासक प्रयत्न करू लागले. तेव्हा स्वामीजी ताट बाजूला सारून उभे राहिले आणि म्हणाले, “त्याला नव्हे, आपल्याला बदलावे लागेल, आपण समजून घेतले पाहिजे.” दुपारी २.३० वाजलेले असूनही स्वामीजी जेवण सोडून त्या गृहस्थाकडे गेले. त्यांनी समोरच्या व्यक्तीला नव्हे, तर स्वत:ला बदलले आणि क्षणार्धात उपाय पाढला. अशा प्रकारे आपणही आपल्या विचारात अर्थपूर्ण बदल करून प्रतिकूल परिस्थिती शांत करू शकतो.

डॉ. साधू ज्ञानानंददास प्रेरक वक्ते

बातम्या आणखी आहेत...