आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करान्यूझीलंडच्या सर्वात कमी वयाच्या पंतप्रधान जेसिंडा अर्डर्न यांच्याकडे पदही होते आणि ताकदही होती. त्या लोकप्रिय होत्या आणि पूर्ण जगात कामावरून ओळखल्या जात. त्यांच्या काही प्रभावशाली कामांमध्ये बाल गरिबीचे आकडे बदलण्याची इच्छा, कामगारांचे वेतन आणि स्थिती सुधारण्यापासून राष्ट्रीय ओळखीच्या मुद्द्यावर धाडस करून घेतलेले निर्णय आहेत. जेसिंडांनी अचानक राजीनामा दिला. त्यांच्यानुसार कौटुंबिक जबाबदाऱ्या त्यांना साद घालत आहेत. राजकारणात अशा निर्णयांची सवय या जगाला नाही. सत्ता म्हणजे सर्वकाही. सध्या जगभरात लोकशाहीची स्थिती आपण बघतच आहोत. ब्राझीलपासून इस्रायलपर्यंत सत्तेवरील लोकांविरोधात लोक आंदोलन करत आहेत. अशात हा राजीनामा खूप काही सांगतो. त्यांच्या या निर्णयाने आजच्या समाजात सत्ता, जबाबदारी, कुटुंब, पुरुष आणि स्त्री यांच्या भोवताली एकदम अनेक प्रश्न निर्माण केले आहेत. ज्या समाजात स्त्रिया आपले ध्येय गाठण्यासाठी घर-दार किंवा कुटुंबापासून लांब जातात अशात हा निर्णय उदाहरण आहे. एकीकडे जगभरातील स्त्रियांसाठी त्यांनी नैतिक नेतृत्वाचे दुर्मिळ उदाहरण दिले आहे आणि या निर्णयातून असेही दिसते की, एका स्त्रीसाठी तिचे कुटुंबदेखील महत्त्वाचे ठरते. इंद्रा नुई यांची कथा कोण विसरेल? जेव्हा त्यांच्या मुलाने त्यांना पत्र लिहून कळवले की, जर त्याची प्रेमळ आई घरी येईल तेव्हा तो त्यांना आणखी प्रेम करेल.
राजकीय नेतेही माणसं आहेत आणि त्यांना लोकांकडून मूल्य असलेली नजर हवी आहे. मला वाटते की, ही समज जगातील सर्व लोकांकडे हवी. असे म्हटले जाते की, ‘मोठ्या ताकदीसह मोठी जबाबदारही येते!’ स्पायडरमॅन चित्रपटातील हा संवाद खूप लोकप्रिय झाला. जेसिंडा यांनी पंतप्रधान असताना दाखवून हे दिले आणि खुर्चीवर राहणे आणि सोडण्याचा निर्णय त्यांनी जबाबदारीने घेतला. हार्वर्डचे मानसशास्त्रज्ञ कॅरल गिलिगन यांचे म्हणणे आहे की, नैतिक दृष्टिकोनातील फरक लिंग आधारितही असतो, म्हणजे पुरुष आणि महिला आपल्या आयुष्यात नैतिक विकासासाठी वेगवेगळे, मात्र समान मार्गांचे पालन करतात. हे मार्ग त्यांना विविध नैतिक मापदंडांच्या आधारावर आपली नैतिक आवड तयार करण्यासाठी प्रेरित करतात. गिलिगन यांच्यानुसार जेव्हा निर्णय घेण्याची गोष्ट येते तेव्हा काही जण न्याय, समानता, नि:पक्षता आणि अधिकारांच्या सिद्धांतांवर नैतिक निर्णय घेतात. हा एक न्याय्य दृष्टिकोन आहे. मात्र इतर जण आपल्या निर्णयात ‘काळजी वा संगाेपन’ला महत्त्व देतात. जेसिंडा अर्डर्न यांनीही त्या ‘काळजी’ला आपल्या नैतिक निर्णयाचे साधन आणि साध्य बनवले. आणि जगाला खूप सहज समजावले की आयुष्य फक्त मिळवणेच नसते. (ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत.)
नंदितेश नीलय लेखक आणि प्रेरक वक्ते nanditeshnilay@gmail.com
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.