आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Opinion
  • Refusal Of Pharmaceutical Companies To Return The Advance Amount Of Corona Vaccines

नफेखोरी:कोरोना लसींची आगाऊ रक्कम परत करण्यास औषध कंपन्यांचा नकार

स्टीफेनी नोलन, रेबेका रॉबिन्सएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जगभरात कोविड-१९ लसींची मागणी संपली आहे. यामुळे गरीब देशांना लस पुरवणाऱ्या कार्यक्रमाशी संबंधित संघटना औषध कंपन्यांसोबत केलेले करार संपवण्याचे प्रयत्न करताहेत. आतापर्यंत लसीसाठी आगाऊ घेतलेले जवळपास १२ हजार कोटी रुपये परत करण्यास औषध कंपन्यांनी नकार दिला आहे. जागतिक कोविड लसीकरण कार्यक्रम कोवॅक्सकडून लस घेणारी संघटना गॅवीने रद्द केलेल्या मागणीची रकमेची माहिती दिलेली नाही. गॅवीच्या कागदपत्रातून दिसते की, कंपनी पैशांचे नुकसान कमी करण्याचा प्रयत्न करत आहे.

गॅवी जिनिव्हातील स्वयंसेवी संघटना आहे. ती अमेरिकी सरकार आणि बिल मेलिंडा गेट्स फाउंडेशनसह इतर दात्यांकडून मिळणाऱ्या पैशांचा वापर गरीब देशांमध्ये मुलांच्या लसीकरण कार्यक्रमात करते. महामारीच्या सुरुवातीला गॅवीला विकसनशील देशांसाठी लस घेण्याची जबाबदारी देण्यात आली होती. औषधी कंपन्यांनी श्रीमंत देशांना लसींच्या पुरवठ्यात प्राधान्य दिले होते. गॅवीने अखेर नऊ उत्पादकांशी करार केला. मात्र, २०२१ च्या अखेरपर्यंत विकसनशील देशात लस पोहोचवणे सुरू झाले नाही. जोपर्यंत गॅवीला लसींचा चांगला पुरवठा होऊ लागला तोपर्यंत मागणी घटू लागली होती. लसी उत्पादकांनी कोवॅक्स कार्यक्रमासाठी १.६ लाख कोटी रुपयांच्या लस विकल्या. करारांतर्गत कंपन्या गॅवीने दिलेली आगाऊ रक्कम परत करण्यास बाध्य नाहीत. अनेक आरोग्य तज्ञांचे म्हणने आहे, गॅवीने रद्द केलेली मागणी बघता कंपन्यांनी पैसे परत द्यायला हवेत. आजार नियंत्रण आणि निर्मूलन केंद्राचे माजी प्रमुख थॉमस फ्रीडमॅन यांचे म्हणने आहे, कोविड लस उत्पादकांची जबाबदारी आहे कारण त्यांची उत्पादने समाजाच्या भल्यासाठी बनवण्यात आली होती. लसीच्या संशोधनात लाेकांचा पैसा लागला आहे.

बातम्या आणखी आहेत...