आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अग्रलेख:विश्वासार्ह डेटा अचूक योजनांसाठी आवश्यक

औरंगाबाद22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

वर्ष २०२१-२२ मध्ये देशातील सरासरी पाच जणांच्या कुटुंबाने दररोज २.१३५ लिटर दूध वापरल्याचे सरकारी दुग्ध विभागाच्या आकडेवारीत आढळले. दुधाचा भाव ४० रुपये प्रतिलिटर मानला तरी याचा अर्थ फक्त दुधावर दररोज सरासरी ८५ रुपये खर्च येतो. दुसरीकडे जागतिक बँकेने भारतातील दारिद्र्य मर्यादा २७.२० रुपये प्रति व्यक्ती प्रतिदिन उपभोगावर (किंवा प्रति कुटुंब रुपये १३६) ठेवली आहे. सरकारच्याच एका अहवालात म्हटले आहे की, सरासरी कुटुंब दररोज १५६ रुपये खर्च करते, त्यामध्ये सर्व वैयक्तिक खर्च समाविष्ट आहेत. मग तो केवळ दुधावर ८५ रुपये खर्च करतो, यावर विश्वास कसा ठेवायचा? यातच दोन ते तीन मुलांचे शिक्षण, आरोग्य, कपडे यांचा समावेश आहे. दुधाची निर्यातही नगण्य आहे. सरासरी कुटुंबातील अन्नावरील एकूण खर्चापैकी केवळ २१% दुधावर खर्च होतो, असे सरकार मानते. ही वस्तुस्थिती पाहता दूध उत्पादनाची आकडेवारी कोठूनही योग्य वाटत नाही. योग्य आकडेवारी उपलब्ध न झाल्यास नियोजन अवघड होईल किंवा सरकार चुकीच्या योजनांवर खर्च करेल, त्यांचा काही फायदा होणार नाही, अशी चिंता आहे. जागतिक अविश्वासाचा परिणाम असा की, शेजारी चीनच्या कोणत्याही डेटावर विश्वास ठेवला जात नाही.

बातम्या आणखी आहेत...