आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासध्या आयुष्य ओटीटी व ओटीपी यांच्यामध्ये झुलत आहे. काही लोकांचे आयुष्य तर सध्या दोन्हींसोबत चालत आहे. ओटीटी म्हणजे ओव्हर द टॉप. करमणुकीच्या विश्वात डिजिटल माध्यमांवर कंटेंटचा एक प्लॅटफॉर्म आहे. भरपूर व्हिडिओ, चित्रपट, मालिका यावर असतात. हे अत्यंत वास्तववादी असले तरी अभद्र व हिंसकही आहे. मात्र, आपल्याकडे ओटीटीसारखे साहित्य यापूर्वी आलेले आहे. त्याला गीता म्हणतात. श्रीकृष्णाने याचे सादरीकरण तसेच केले आहे. इतका वास्तववादी कंटेंट कदाचित कुठेच मिळत नसावा. ओटीपी म्हणजे वन टाइम पासवर्ड. एखादे ऑनलाइन काम करत असताना ओटीपीची गरज भासते. दिवसभरातून एकदा ध्यानधारणा करा. यामुळे तुमची सर्व कामे व्यवस्थित होतील. कृष्णाने गीतेमध्ये व्यवस्थित विचार मांडले आहेत. ध्यानधारणा म्हणजे विचारांना शून्य करणे. त्यामुळे गीतेमध्ये ध्यानाचे महत्त्वही सांगितले आहे. तुम्ही आज डिजिटल विश्वात रमत असाल तर ओटीटी आणि ओटीपीचे एक धार्मिक महत्त्व समजून घ्या, नुकसान कमी होईल.
पं. िवजयशंकर मेहता humarehanuman@gmail.com
Facebook:Pt. Vijayshankar Mehta
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.