आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Opinion
  • Remember That Family Plays A Role In Success | Article By Vijayshankar Mehata

जीवनमार्ग:यशात कुटुंबाचा वाटा असतो हे लक्षात ठेवा

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कुटुंब प्रत्येकासाठी महत्त्वाचे असते. कुटुंबामुळे आपण असतो. कुटुंबात सर्व प्रकारचे नातेसंबंध असतात, जे आपल्यापेक्षा मोठे, लहान असतात. आपल्या कुटुंबातील लोक नेहमीच आपल्या मनात असतात, याची जाणीव ठेवूनच नेहमी वागले पाहिजे. बाहेरच्या जगात आपल्याला जेव्हा यश मिळते, तेव्हा काही लोक आशीर्वाद देतात, काही सहकार्य करतात, काही प्रशंसा करतात, मात्र अशा वेळी कुटुंबाला विसरू नये. तुमच्याकडे जे काही आहे ते त्या प्रत्येक सदस्याने दिलेले आहे, जे तुमच्या कुटुंबाशी जोडलेले आहे. श्रीरामाच्या राज्याभिषेकावेळी तुलसीदासजींनी लिहिले,- ‘प्रथम तिलक बसिष्ट मुनि कीन्हा। पुनि सब बिप्रन्ह आयसु दीन्हा॥ सुत बिलोकि हरषीं महतारी। बार बार आरती उतारी॥’ आधी मुनी वसिष्ठांनी गंध लावला. नंतर त्यांनी सर्व ब्राह्मणांना गंध लावण्याची परवानगी दिली. मुलाला राजसिंहासनावर पाहून माता आनंदी झाल्या. त्यांनी औक्षण केले. या ओळीचा अर्थ असा की, वसिष्ठ मुनींनी आशीर्वाद दिला. ब्राह्मणांनी यशोगान केले. मात्र औक्षण आईनेच केले. आई कुटुंबातील प्रमुख असते. त्यामुळे आपल्याला जेव्हा या जगात यश मिळते तेव्हा आपल्याला दृष्ट लागू नये, आपले नुकसान होऊ नये, नेहमी सुख-समृद्धी राहावी, अशीच प्रार्थना कुटुंबातील सदस्य करत असतात. त्यामुळेच आपल्या प्रत्येक यशात कुटुंबाला नक्की ठेवावे. औक्षण करणे म्हणजे तुम्हाला दृष्ट लागू नये, विशेषत: जेव्हा तुम्ही तुमच्या ध्येयाकडे वाटचाल करत असता आणि यशाकडे जात असता.

पं. िवजयशंकर मेहता humarehanuman@gmail.com

बातम्या आणखी आहेत...