आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा‘मुंबईत रेल्वे डब्याला आग,२४ जणांचा मृत्यू, चौकशीचे आदेश’ ही १४ फेब्रुवारी १९७६ रोजीचा इंडियन एक्स्प्रेसचा मथळा होता. अपघाताच्या काही दिवसांनंतर सार्वजनिक वाहतुकीत ज्वलनशील पदार्थ नेण्यास तात्काळ बंदी घातली गेली. हा नियम लागू करण्यामागे रुख्मिणी कृष्णमूर्ती नावाची महिला होती. (आता ७४ वर्षांच्या आहेत), त्या अपघातानंतर पहिल्यांदा जळालेल्या कोचमध्ये गेल्या आणि त्यांना राखेत अर्धवट जळालेल्या प्लास्टिक कंटेनरमध्ये केरोसीनचे अंश आढळले. यातून स्पष्ट झाले की एखादा प्रवासी केरोसीन घेऊन जात होता आणि सिगारेटमुळे त्याला आग लागली असावी.त्यावेळी मी त्यांना ओळखू शकलो नाही. कारण मी इतरांसारखाच वाचक होतो. पण त्यांच्या टिप्पण्या काळजीपूर्वक वाचत होतो. ज्यामुळे केरोसीनचे स्वरूप फॉरेन्सिक दृष्टिकोनातून समजण्यास मदत झाली. मला मनातून वाटत होते की, त्यांची भेट व्हावी. नंतर ती झालीसुद्धा. तुम्ही जे उत्कटतेने विचार करता ते घडते आणि कर्ताही वरूनच असतो. १२ मार्च १९९३ ला जेव्हा मुंबई बॉम्बस्फोटांनी हादरली, तेव्हा मी स्फोटाच्या एका ठिकाणाजवळच होतो. तोपर्यंत मी एक प्रस्थापित पत्रकार झालो होतो. त्या दशकातील प्रसिद्ध मॉर्निंग टॅब्लॉइड ‘द डेली’ मध्ये वाहतूक व क्राइमसारखे महत्त्वाचे बीट पाहत होतो. पुढील काही आठवड्यांपर्यंत माझी आणि माझ्या टीमची झोपच उडाली होती. आम्ही शक्य ती स्टोरी कव्हर करण्याचा प्रयत्न केला. एवढेच काय तर फॉरेन्सिक विभागाच्या रुख्मिणी आणि त्यांचे डझनभर सहकारी स्फोटाच्या मुळापर्यंत पोहोचण्यासाठी प्रत्येक तुकडा जोडण्याच्या प्रयत्नात होते. त्या वेळी या विभागात मला जे शिकायला मिळाले, या विषयावर मला भरपूर ज्ञान मिळाले आणि माझी पत्रकारिता खुलून गेली. मी जेथे उपस्थित होतो ती एक घटनाच नव्हे तर अनेक घटनाक्रम होते, जेथे योगायोगाने मी उपस्थित राहिलो. यामुळे मला पत्रकार म्हणून आपले काम चांगले करण्याची पहिली माहिती दिली. मला नेहमीच वाटायचे की करणारा मी नाही, ही ईश्वरी शक्ती आहे, जी मला त्या ठिकाणी हजर करून हे काम करून घेत आहे. या सोमवारी जेव्हा मी इस्कॉनचे स्वामी गौरांग प्रभू यांचा व्हिडिओ पाहिला तेव्हा माझा विश्वास आणखी दृढ झाला. व्हिडिओत ते सांगाताहेत की ९० च्या दशकात एकदा ते लोकल ट्रेनच्या गर्दीच्या डब्यात चढले. तेथे ते हातही हलवू शकत नव्हते. त्यांच्याकडे गीता असलेली थैली होती. एक उंच मनुष्य काही लोकांसोबत दुसऱ्या स्थानकावरून गाडीत चढला. त्याने वार्तालाप सुरू केला. ‘तुम्ही कृष्ण इस्कॉनचे आहात?’ स्वामीजी हसून म्हणाले, ‘आणखी कोणी असा वेश धारण करतो का?’ व्यक्ती म्हणाली, ‘गीता आहे का?’ स्वामीजी म्हणाले, ‘होय थैलीत आहे, पण मी थैलीत हातही घालू शकत नाही. हवी असेल तर थैल्यात हात घालून एक काढून घ्या.’ त्याने ती काढून विचारले ‘कितीची आहे?’ स्वामीजी म्हणाले ‘७० रु.’ त्याने आपल्या शर्टाच्या खिशातून १०० रु.ची नोट काढली आणि म्हणाला, {फंडा असा की, आपला विश्वास असायला हवा की आपल्या सर्वांच्या वर कोणीतरी आहे जो खरा कर्ता आहे आणि आपण पृथ्वी म्हणतो त्या मोठ्या चाकातील फक्त तार आहोत.
एन. रघुरामन, मॅनेजमेंट गुरू [raghu@dbcorp.in]
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.