आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सरहद्दीवरील शेतकऱ्यांना दिलासा:भारत-पाकिस्तान सीमेवर शेतींचे काटेरी कुंपण काढण्यास प्रारंभ, सुरुवात पठाणकोटपासून

बलदेव कृष्ण शर्मा | चंदीगडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • कुंपण झीरो लाइनपासून 200 मीटरपर्यंत अलीकडे

भारत-पाकिस्तान सरहद्दीनजीक शेतकऱ्यांच्या शेतीभोवतीचे तारेचे कंुपण लवकरच काढले जाणार आहे. सीमेवरील तारेचे कंुपण पुढे लावण्याच्या पथदर्शी प्रकल्पास पटाणकोट येथून सुरुवात झाली आहे. केंद्रीय गृहमंत्रालय आणि बीएसएफ ८.५ किमी परिसरात ही चाचणी करीत आहे. याअंतर्गत तारेचे कुंपण झीरो लाइनपासून फक्त २०० मीटर अंतरापर्यंत अलीकडे करण्यात येणार आहे. आंतरराष्ट्रीय निकष १५० मीटरचा आहे.

पंजाब सरकारने २०० मीटर अलीकडेपर्यंत करण्याचा सल्ला दिला होता. सध्या काही ठिकाणी हे अंतर ४०० मीटरपेक्षाही जास्त आहे. वास्तविक, या ठिकाणी पिकाऊ जमीन रिकामी आहे अथवा शेतकरी मर्यादित भागातच शेती करतात. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या बॉर्डर मॅनेजमेंट पथकाच्या अभियंत्यांनी नुकताच या भागाचा दौरा केला होता.

१९८८ मध्ये भारताने घातले होते कुंपण
पथदर्शी प्रकल्प यशस्वी ठरल्यास तारेचे कंुपण पुढे असल्याने शेतकऱ्यांना शेतीसाठी मोठी जमीन उपलब्ध होणार आहे. सुरक्षाही वाढेल भारताने १९८८ मध्ये तारेचे कुंपण घातले होते. अनेक भागात झीरो लाइन व कुंपण यामध्ये पिकाऊ जमीन पडीक आहे. यावर शेतीसाठी बीएसएफच्या परवानगीची गरज आहे. त्यांची निगराणी असते.

यामुळे शेतकऱ्यांचा फायदा होईल
या निर्णयामुळे शेतकऱ्यांना त्यांची जमीन उपलब्ध होणार आहे. शेतकऱ्यांची ही समस्या केंद्रीय गृहमंत्र्यांच्या भेटीत त्यांच्या कानावर टाकली होती.केंद्राच्या प्रकल्पास राज्य सरकारचे सहकार्य आहे. - भगवंत मान, मुख्यमंत्री, पंजाब

चाचणी सफल झाल्यास पूर्ण सहद्दीवर लागू
पंजाबमध्ये हा प्रकल्प सफल झाल्यास सर्व सरहद्दीवर याची अंमलबजावणी केली जाईल.
-प्रभाकर जोशी, डीआईजी बीएसएफ, गुरदासपूर

बातम्या आणखी आहेत...