आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Opinion
  • Repeated Viewing Of Sad News Can Lead To Addiction, Increase Irritability | Marathi News

अध्ययन:दु:खद बातम्या वारंवार पाहिल्यास व्यसन लागणे शक्य, चिडचिडेपणा वाढेल

न्यूयॉर्क15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तुम्हाला टीव्ही किंवा फोनवर एकच बातमी वारंवार पाहणे किंवा वाचण्याची इच्छा होत असल्यास त्याचा शरीर तसेच मनावर वाईट परिणाम होऊ शकतो. त्यातही दु:खाच्या बातम्या. उदाहरणार्थ- कोरोन, युद्धाचे वृत्त किंवा एखादी दुर्घटना. बातम्यांमध्ये अडकून पडल्यानंतर लोक आजारी पडण्याची शक्यता वाढते, असे अमेरिकेच्या टेक्सास टेक विद्यापीठाने केलेल्या अध्ययनातून स्पष्ट झाले आहे. अशा बातम्यांमध्ये राहणाऱ्या लोकांत चिडचिडेपणा, तणाव वाढतो. आरोग्य बिघडत असल्याचे दिसून आले आहे. दु:खद आशय असलेल्या बातम्यांना सखोल वाचणारे व ऐकण्याच्या सवयीला डूम स्क्रोलिंग असे नाव देण्यात आले आहे. हेल्थ कम्युनिकेशनमध्ये प्रकाशित एका अभ्यासात ११०० जणांचे अध्ययन करण्यात आले. त्यापैकी १७ टक्के लोक गंभीर रूपात डूम स्क्रोलिंगचे शिकार असल्याचे लक्षात आले. म्हणजेच वाईट घडामोडी जाणून घेण्याची सवय लागलेले लोक यात समाविष्ट होतात.

कमी बातम्या पाहणारे आनंदी, शांत
ऑस्ट्रेलियाचे डॉ. केट मॅनेल म्हणाल्या, कोरोनानंतर लोकांची डूम स्क्रोलिंगची सवय वाढली. बातम्यांपासून कधी-कधी दूर राहणे तुम्हाला शांत व एकाग्र माणूस बनवू शकते. असे लोक घरी जास्त आनंदी आणि शांत असतात.

बातम्या आणखी आहेत...