आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जीवनमार्ग:आपला चांगुलपणा प्रकट करा

छत्रपती संभाजीनगर20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आगामी काळात निवडणुकीचा गोंगाट वाढणार आहे. यामध्ये आर्थिक बाजूवर खूप काम होईल. भेटीगाठी म्हणजे जनसंपर्क. आर्थिक बाजू म्हणजे विकास आणि प्रगतीचे दावे. निवडणुकीचा गदारोळ पाहून काही लोक चिडतात, नेत्यांना शिव्या देतात. देशात लोकशाही आहे, त्यामुळे निवडणुकांना विधी मानले पाहिजे. नेता चांगला की वाईट हा आपला विषय नसावा. वाईटपणा नसता तर सर्व पटकथा अपूर्ण राहिल्या असत्या किंवा लिहिल्याच गेल्या नसत्या. कंस होता म्हणून श्रीकृष्ण आले. रावणामुळे श्रीरामाला यावे लागले. श्रीकृष्ण माठ फोडायचा किंवा लोणी चोरायचा तेव्हा त्याला कंसाची आर्थिक बाजू कमकुवत करायची होती. कंस हा उत्तम बॉक्सर होता. त्याच्याकडे चाणूर आणि मुष्टिक यासाठीच होते. कंसाचा वध करताना कृष्णाने आपली मूठ वापरून सांगितले होते की, व्यवस्था प्रस्थापित करायची असेल तर इतरांचा वाईटपणा पाहू नका, आपला चांगुलपणा प्रकट करा. पं. िवजयशंकर मेहता humarehanuman@gmail.com Facebook:Pt. Vijayshankar Mehta

बातम्या आणखी आहेत...