आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Opinion
  • Rohingya Refugees Could Become A Major Problem In The Future | Article By Abhijit Ayyar Mitra

विश्लेषण:भविष्यात रोहिंग्या निर्वासित ही एक मोठी समस्या ठरू शकते

औरंगाबाद17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

रोहिंग्यांच्या समस्येचे वांशिक व धार्मिक हे आयाम आहेत व दोन्ही एकमेकांशी संबंधित आहेत. रोहिंग्यांची संख्या अद्याप फार नसेल, पण ते ईशान्येकडील प्रदेशांसाठी स्फोटक परिस्थिती निर्माण करू शकतात. ते वरून निर्वासित म्हणून दिसत असले तरी त्यांच्यात देशाच्या सुरक्षेसाठी धोका ठरू शकणारे अतिरेकी घटक आहेत.

बहुसंख्य रोहिंग्या चितगावमधील पर्वतीय जमाती आहेत, त्यांनी १९ व्या-२० व्या शतकात बर्माच्या राखिने प्रांतात स्थलांतर केले. ते बंगालची एक उपभाषा बोलत असत. ते वेगळी वांशिक-सांस्कृतिक ओळख असलेल्या राखिनेच्या स्थानिक ‘कमान’ मुस्लिमांत मिसळले. बर्मा ऐतिहासिकदृष्ट्या स्थलांतरितांबद्दल असहिष्णु आहे. याच कारणामुळे त्यांनी १९६० च्या दशकात लाखो तामिळ भारतीयांना हुसकावून लावले होते. रोहिंग्यांची समस्या अशी होती की, त्यांची बर्माशी असलेली निष्ठा संशयाच्या भोवऱ्यात राहिली. इस्लामी जगताकडे त्यांचा अधिक कल होता.

हीच प्रवृत्ती भारतासाठीही धोक्याचा संकेत आहे. आपल्याला माहीत आहे की, आपल्या ईशान्येकडील प्रदेशात वांशिक बहुलता आहे आणि तिथे जात धर्मापेक्षा अधिक महत्त्वाची आहे. उदा. सीएए आणि एनआरसी हे उर्वरित भारतासाठी धार्मिक मुद्दे असताना सर्वात जास्त प्रभावित आसामसाठी धर्माशी त्याचा काहीही संबंध नव्हता. तेथील आसामी मुस्लिमांनी सीएए आणि एनआरसीचे समर्थन केले, कारण ते बांगलादेशी आणि पश्चिम बंगालच्या मुस्लिमांची घुसखोरी त्यांच्या वारशासाठी धोका मानतात. बांगलादेश आणि पश्चिम बंगालमधील मुस्लिम धार्मिक एकतेवर विश्वास ठेवत असले तरी आसामी मुस्लिमांसाठी त्यांची संस्कृती आणि वंश अधिक महत्त्वाचा आहे. आसामी मुस्लिमांची चिंता बर्माच्या कमान मुस्लिमांसारखीच आहे, हे येथे नमूद करावे लागेल. अशी परिस्थिती ईशान्येकडील प्रत्येक राज्यात पाहायला मिळते.

विशेष म्हणजे रोहिंग्या निर्वासितांसाठी दोन्ही हात पसरून भारताचे स्वागत करणारे राज्यदेखील वंश आणि धर्म यांचे मिश्रण असलेले काश्मीर आहे. जिथून स्थानिक पंडितांना हुसकावून लावले होते, पण रोहिंग्यांचे स्वागत वांशिक आणि सांस्कृतिक परकीयांकडून केले जात आहे, हेच ते राज्य आहे. अनेक कारणांमुळे भारतासाठी ही धोक्याची घंटा आहे. पहिली गोष्ट म्हणजे पाकिस्तानात रोहिंग्यांची मोठी लोकसंख्या आहे. रोहिंग्या अतिरेक्यांसाठीही ते आश्रयस्थान आहे. २०१७ च्या निर्वासित-संकटाच्या आधीपासून हाफिज सईदसोबत रोहिंग्या जिहादी दिसत आहेत. ते संकट कसे सुरू झाले याची कथाही मजेदार आहे. हे सर्वज्ञात आहे की, गनिमी योद्धे नागरिकांचा मानवी ढाल म्हणून वापर करतात. राखिनेमध्येही असाच प्रकार घडला. २०१७ मध्ये अराकान रोहिंग्या सॅल्व्हेशन आर्मी नावाच्या संशयित गनिमी गटाने बर्मी पोलिसांवर हल्ले केले. हे हल्ले अचानक सुरू झाले, कारण तिथे त्यापूर्वी कोणताही तणाव नव्हता. अनेक अधिकाऱ्यांना ठार मारल्यानंतर गनिमी गटाचे सदस्य विविध गावांमध्ये लपले, परंतु त्यांनी त्यांच्या ओळखीचा पुरावा नष्ट केला नाही. जणू ते बर्मी सैन्याला आमंत्रण देत होते की, या आणि आम्हाला शोधा.

बर्मी सैन्याने प्रत्युत्तराची तयारी केली तेव्हा त्यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर आंतरराष्ट्रीय मानवाधिकार कायद्यांची सखोल माहिती असलेली विधाने पोस्ट केली आणि संरक्षणाच्या अधिकाराबद्दल बोलू लागले. त्यांनी आपल्यावर होणाऱ्या अत्याचाराचा अपप्रचार करण्यास सुरुवात केली आणि नागरी भागात आपल्याला वेठीस धरले जात असल्याचे व छळ केला जात असल्याचे सांगू लागले. त्यांनी परकीय शक्तींकडे मदतीची याचना केली. पण, आपणच हल्ले सुरू केले होते आणि आपली ओळख गुप्त न ठेवता तेच नागरी भागांत लपले होते, हे त्यांनी सांगितले नाही. अनेक मार्गांनी ते सिरियन अतिरेकी आणि बोस्नियन लोकांनी जे केले तेच करत आहेत - नरसंहारासाठी परिस्थिती निर्माण करणे, पाश्चात्त्य सैन्य दलांना हस्तक्षेप करण्यास भाग पाडणे.

२०१७ चे अतिरेकी हल्ले हे पूर्ण माहीत असताना केले गेले की, बर्मी सैन्याची यावर अति-प्रतिक्रिया येईल आणि त्यामुळे निर्माण होणारे निर्वासित-संकट संपूर्ण प्रदेशाला अस्थिर करेल. मग प्रश्न पडतो की, असे कोणत्या उद्देशाने केले गेले? एक देश म्हणून आपण मेंढ्याच्या कातडीत लपलेल्या लांडग्यांपासून सावध राहिले पाहिजे. (ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत.)

अभिजित अय्यर मित्रा सीनियर फेलो, आयपीसीएस abhijit@ipcs.org

बातम्या आणखी आहेत...