आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Opinion
  • Russia's Huge Losses By Simultaneous Attacks In Several Places | Marathi News

विश्लेषण:रशियाची माघार सुरू, नुकसान कमी करण्यासाठी पाऊल मागे, एकाच वेळी अनेक ठिकाणी हल्ल्यांनी रशियाचे मोठे नुकसान

औरंगाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

२९ मार्चला रशिया व युक्रेनचे प्रतिनिधी इस्तंबूलमध्ये चर्चेसाठी भेटले तेव्हा रशियाच्या उप-संरक्षणमंत्र्यांनी रशियन रणनीतीत बदल करण्याचे संकेत दिले होते. ते म्हणाले की, रशिया कीव्ह आणि चेर्निहाइव्हच्या आसपासच्या लष्करी कारवाया मोठ्या प्रमाणात कमी करेल. आता रशियन सैन्य प्रतिहल्ला टाळण्यासाठी माघार घेताना पूल नष्ट करत आहेत. दोन पाश्चात्त्य देशांच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, रशियाने आपले नुकसान कमी करण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेतला असावा. एका अधिकाऱ्याने सांगितले की, ही माघारच आहे. कीव्हव्यतिरिक्त युक्रेनियन सैन्याने मार्चच्या उत्तरार्धात खेरसन आणि इतर भागांवर प्रभावी हल्ले केले.

झेलेन्स्कींचा विजयाचा दावा
युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी २५ मार्चला कीव्ह येथे एका मुलाखतीत इकॉनॉमिस्टला सांगितले की, युक्रेनच्या प्रतिकाराचे रहस्य लोकांच्या सामर्थ्यात आहे. युद्ध आमच्याबाजूने वळले आहे. ते म्हणतात, आमचा विजय हा फक्त काही काळाची बाब आहे. झेलेन्स्की म्हणतात, युक्रेन यशस्वी होण्यासाठी पाश्चात्त्य देशांनी रशियावर कठोर आर्थिक निर्बंध लादले पाहिजेत. आम्हाला लढाऊ विमाने, रणगाडे यांसह आणखी शस्त्रे दिली पाहिजेत. निर्बंधांमुळे रशियाची दीर्घ युद्ध लढण्याची क्षमता कमी होईल.© 2019 The Economist Newspaper
Limited. All rights reserved

बातम्या आणखी आहेत...