आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा८०० घरांचे इको-फ्रेंडली डिझाइन केले, प्रत्येक घरात सरासरी एक लाख लिटर पाणी बचत. स्थानिक समुदायासह बांधल्या दोन लाख पुनर्भरण विहिरी.
महात्मा गांधींनी वास्तुविशारद लॉरी बेकर यांना सांगितले होते की, घर बांधण्यासाठी साहित्य घराच्या ५ मैलांच्या आत मिळाले पाहिजे. सुप्रसिद्ध वास्तुविशारद चित्रा विश्वनाथ सांगतात की, ५ मैलांवरून का? घराचे बांधकाम साहित्य पायाखालून मातीच्या स्वरूपात गोळा करता येते. बंगळुरूच्या चित्रा बायोम सोल्युशन्सच्या संस्थापक आहेत आणि त्यांचे पती विश्वनाथ एस. अभियंता व बायोम ट्रस्ट आणि बायोम वॉटर मॅनेजमेंट सोसायटी चालवतात. त्यांच्याकडून पर्यावरणावरील मोहिमेबद्दल जाणून घ्या.
घरात पाण्याचे बिल शून्य येईल, वीज बिल किमान आणि मग घराच्या देखभालीचाही विशेष खर्च नाही, असे मी तुम्हाला सांगितले तर! इकाॅलॉजिकल आर्किटेक्चर हे त्याचे उत्तर आहे. पारंपरिक घरांप्रमाणे पर्यावरणपूरक इमारतींमध्ये कचरा निर्माण होत नाही. अशी घरे बनवताना पायाखालची माती मुबलक प्रमाणात वापरली जाते. घराची रचना अशी आहे की, घराचे तापमान योग्यरीत्या राखले जाते, जास्तीत जास्त नैसर्गिक प्रकाश येतो, पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा पुनर्वापर केला जातो. बांधकाम साहित्य असे असावे की, ते नंतर वापरता येईल. निसर्गाला अनुकूल घर बांधण्यासाठी जास्त खर्च येईल असे लोकांना वाटते. वास्तविक, सरकारने सिमेंट, स्टीलचे अनुदान देणे बंद केले तर खरी किंमत कळेल. तथापि, इको-फ्रेंडली घरांच्या साहित्याची किंमत जास्त नसते. ते बनवणाऱ्या कारागिरांचाच खर्च अदिक असतो, तेही बहुतांश काम हातानेच केले जाते म्हणून. बंगळुरूत १०० किलोमीटर अंतरावरून पाणी येते. बंगळुरूपासून चेन्नईपर्यंत आणि संपूर्ण देश पाण्याच्या भीषण संकटाचा सामना करत आहे. अशा परिस्थितीत निसर्गानुकूल घर, रेन वॉटर हार्वेस्टिंग हेच याचे उत्तर आहे.
त्यांचे घर त्यांच्यासाठी प्रयोगशाळा असल्याचे चित्रा-विश्वनाथ सांगतात. जगाला आधी शिकवण्याऐवजी आम्ही आमचे घर पर्यावरणपूरक बनवले. पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा पुनर्वापर करणारी यंत्रणा निर्माण केली. विश्वनाथ सांगतात की, बंगळुरूजवळ एक पारंपरिक विहीर खोदणारा समुदाय आहे – “मन्नू वड्डर”. आता लोक बोअरवेल खोदत आहेत, त्यामुळे या समाजाला काम नव्हते. बायोम वॉटरने २०१५ मध्ये “मिलियन वेल्स फॉर बंगळुरू” मोहीम सुरू केली. यात मन्नू वड्डर यांच्यासोबत पुनर्भरण विहिरी खोदत आहेत. एका पुनर्भरण विहिरीत एक ते दहा लाख लिटर पाणी साठू शकते. बंगळुरूमध्ये १० लाख रिचार्ज विहिरी निर्माण करण्याचे लक्ष्य आहे. आतापर्यंत दोन लाख पुनर्भरण विहिरी बांधल्या आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.