आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेसिपी:शेजवान लॉलीपॉप

टीम मधुरिमा4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

साहित्य : दोन मोठे चमचे तेल, चार बारीक चिरलेले कांदे, एक बारीक चिरलेली सिमला मिरची, सात- आठ बारीक चिरलेल्या बीन्स, एक किसलेले गाजर, दोन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, मीठ आवश्यकतेनुसार, एक छोटा चमचा काळं मीठ, एक छोटा चमचा गरम मसाला, एक चमचा जिरे पावडर, पाव चमचा वाटलेली लाल मिरची, आवडीनुसार लिंबाचा रस, २ छोटे चमचे शेजवान चटणी, सहा उकडून कुस्करलेले बटाटे, ब्रेडचा चुरा, एक मोठा चमचा मैदा, तीन मोठे चमचे पाणी.

कृती : पॅनमध्ये तेल गरम करा. त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा, शिमला मिरची, बीन्स, गाजर आणि हिरवी मिरची टाकून चांगली परतून घ्या. मीठ, गरम मसाला आणि जिरे पावडर टाका. वाटलेली लाल मिर्ची आणि लिंबाचा रस मिसळा. नंतर हे मिश्रण चांगलं परतून झाल्यानंतर त्यामध्ये शेजवान चटणी चांगली मिक्स करून घ्या. त्याच मिश्रणात बटाटे आणि ब्रेड क्रम्सदेखील एकत्र करा. त्यामध्ये कोथिंबीर एकत्र करून हे मिश्रण थंड होऊ द्या. दुसरीकडे एका बाऊलमध्ये मैदा, मीठ आणि पाणी मिसळून त्याचं पातळ मिश्रण तयार करा. बटाट्याच्या मिश्रणापासून छोटे छोटे अंडाकार लॉलीपॉप तयार करा. हे लॉलीपॉप एकेक करून मैद्याच्या पातळ मिश्रणात बुडवून आणि ब्रेड क्रम्समध्ये घोळवून गरम तेलात तळून घ्या. प्रत्येक लॉलीपॉपमध्ये छोटी काडी अडकवून पुदिन्याच्या चटणीसोबत सर्व्ह करा.

बातम्या आणखी आहेत...