आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मॅनेजमेंट फंडा:शाळेचे धडे समाजाला महागात पडू शकतात!

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

दाेन दिवसांपूर्वी माझ्या कझिनचा अमेरिकेच्या फिलाडेल्फियावरून फोन आला आणि त्याने बालरोगतज्ज्ञांशी झालेल्या विचित्र चर्चेविषयी सांगितले. तो पत्नी आणि दोन वर्षांच्या मुलासोबत रेग्युलर चेकअपसाठी गेला होता. दरम्यान, डॉक्टरने विचारले, त्यांच्या कपाटात बंदूक आहे का?

अशा विचित्र प्रश्नाने तो चक्रावला आणि म्हणाला, आम्ही भारताचे आहोत चाकूदेखील किचनव्यतिरिक्त इतरत्र कुठेच ठेवत नाही. नंतर डॉक्टर हसत म्हणाला, ‘मला माहीत आहे, हा प्रश्न चुकीचा आहे पण मला विचारावे लागेल कारण ही अमेरिका आहे.’ अमेरिकन अकॅडमी ऑफ पेडियाट्रिशनच्या मते, ज्या घरात मुले आहेत, त्यांच्याशी शस्त्रांच्या सुरक्षिततेबद्दल बोलावे.

टेक्सास नरसंहारनंतर जगभरात तुमच्या माझ्यासारखे लोक घाबरलेले आहेत, विशेष करून अमेरिकेत. ज्या देशात लोकांपेक्षा जास्त बंदुका आहेत, दर आठवड्याला लहान मुलांना चुकून गोळ्या घातल्या जातात, अशा देशात याविषयावर चर्चा होणे साहजिक आहे.

मी जेव्हा या विषयावर विचार करत होतो, तेव्हा डोक्यात एक विचार आला. गरीब भारतीयांवर उपचार करून चांगला डॉक्टर कोणता प्रश्न विचारू शकतो, त्याला कोणताही वैद्यकीय शब्द किंवा रोग नाही. निदान या महिन्याच्या संदर्भात मनात एक विचार आला, ‘या वर्षी तुम्ही मुलांसाठी किती गणवेश घेतले?’ हा विचार माझ्या डोक्यात यामुळे आला, कारण कालच आमच्या घरात काम करणारी बाई तणावाखाली दिसत होती. मी जेव्हा तिला तिच्या त्रासाविषयी विचारले तेव्हा ती भावुक झाली आणि म्हणाली, दोन वर्षांच्या तुलनेत या वर्षी शाळेचा गणवेश ४० टक्के महाग झाला आणि कुठे भेटतही नाही. गणवेश नसल्यामुळे दोन दिवसांपासून तिचा मुलगा व्यवस्थित जेवत नाही. ती म्हणाली, बाकीच्या लोकांकडून पगार मिळाल्यानंतर ती गणवेश विकत घेईल, पण एकच जोडी घेऊ शकेल. पीटी आणि स्पोर्ट््साठीचे गणवेश घेऊ शकणार नाही. सुमारे दोन वर्षांनंतर आता देशातील बऱ्याच शाळा फ्रेश अकॅडमिक कॅलेंडरसह परत सुरू होत आहेत. त्यातच पालक मुलांसाठी आवश्यक वस्तू, पुस्तके, गणवेश आणि वाहतुकीचे साधन जोडण्यासाठी संघर्ष करत आहेत. याच्याही किमती वाढल्या आहेत. त्यामुळे बऱ्याच पालकांच्या खिशावर वजन पडणार आहे. अजून बऱ्याच जणांनी मुलांसाठी गणवेशही विकत घेतला नसेल. याबरोबरच चीनवरून येणारा धागा व केमिकल येत नसल्याने दोन-तीन महिन्यांपासून गणवेशाची कमतरता जाणवत आहे. सामान्यपणे शाळा दरवर्षी नोव्हेंबर-डिसेंबरमध्येच गणवेशाची अॉर्डर देत असतात.

तथापि, कोविड आणि इतर अनिश्चिततेमुळे, त्यांनी यावर्षी उशिरा ऑर्डर दिल्या आणि पुरवठादार म्हणतात, अनेक शाळांसाठी ऑर्डर प्रलंबित आहेत आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, अनेक शाळा वेगवेगळ्या उपक्रमांसाठी वेगवेगळे गणवेश खरेदी करण्यासाठी दबाव आणत आहेत. दक्षिण भारतात डीपीएसने केल्याप्रमाणे मुलांना साध्या वेशात शाळेत येण्याची परवानगी देणे ही काळाची सर्वात मोठी गरज आहे. यामुळे घराचे बजेट संतुलित होण्यास मदत होईल. त्याऐवजी, मुलांना समोरासमोर वर्गात जाण्याचा आनंद परत मिळावा, अशा अॅक्टिव्हिटीवर शाळांनी लक्ष केंद्रित करावे.

एन. रघुरामन मॅनेजमेंट गुरू raghu@dbcorp.in

बातम्या आणखी आहेत...