आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मॅनेजमेंट फंडा:प्रत्येक उत्सवात सुरक्षेला अनन्यसाधारण महत्त्व

छत्रपती संभाजीनगर22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तुम्हाला गब्बर सिंग आठवत असेल जो त्याच्या टोळीतील सदस्यांना विचारायचा - ‘होळी कधी आहे?’ हेच गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात आपल्यापैकी बहुतेकजण विचारत आहेत. या आठवड्याच्या सुरुवातीला, राज्य सरकारने ६ आणि ७ मार्च रोजी दोन दिवसांची होळी जाहीर केली होती, तर देशात ७ आणि ८ मार्च रोजी राहिला. अमिताभ बच्चन यांच्या ‘रंग बरसे भिगे चुनरवाली’ या गाण्याशिवाय मुंबईतील होळी अपूर्ण आहे. पण ‘सिलसिला’च्या या गाण्यावर अमिताभने जसे नृत्य केले तसे नाचण्याऐवजी आज लोक हैदराबादमधील अपघाताबद्दल बोलत होते, ज्यात ‘प्रोजेक्ट के’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अमिताभला दुखापत झाली. ते एक अ‍ॅक्शन सीन चित्रित करत होते आणि यादरम्यान त्यांच्या उजव्या बरगडीतील दुखापतीमुळे त्यांचा स्नायू खराब झाला. त्यांनी ब्लॉगमध्ये लिहिले की, ‘डॉक्टरांचा सल्ला घेत शूटिंग रद्द करण्यात आले, हैदराबादच्या एआयजी हॉस्पिटलमध्ये सीटी स्कॅन केले आणि मी मुंबईला परतलो. स्ट्रेपिंग करण्यात आले असून विश्रांतीच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आता गोष्टी सामान्य होण्यासाठी काही आठवडे लागतील. सध्या तरी सर्व कामे ठप्प झाली आहेत.’ मीडियाच्या रिपोर्ट्सनुसार, हैदराबादच्या बाहेर शंकरपल्ली येथील एका सेटवर शूटिंग सुरू होते. अमिताभ अन्य कलाकारांसोबत सोबत होते. ते दोरी आणि हार्नेसला लटकले होते आणि सर्व काही ठीक चालले होते. अचानक त्याच्या पाठीत जडपणा जाणवला. ही बातमी कळताच अभिषेक तेथे पोहोचला आणि डॉक्टरांचा सल्ला घेत वडिलांना घरी घेऊन गेला. काही दिवसांपूर्वी ए. आर. रहमान यांचा मुलगा ए. आर. अमीनही अपघाताचा बळी ठरला होता. तो एका चित्रपटाच्या सेटवर शूटिंग करत होता. अमीनने याबद्दल लिहिले की, ‘मी एका गाण्याचे शूटिंग करत होतो आणि मला माझ्या टीमवर विश्वास आहे की त्यांनी सुरक्षेची पूर्ण काळजी घेतली असेल. मात्र मी घटनास्थळी असताना अचानक वरील क्रेनमधून लटकलेले झुंबर कमानीसह खाली आले. नंतर रहमानने एक निवेदन जारी करून चित्रपट उद्योगाला सेट आणि लोकेशन्सवर चांगल्या सुरक्षा व्यवस्थेे आवाहन केले. तो म्हणाला, ‘माझा मुलगा आणि त्याची स्टायलिंग टीम एका भीषण अपघातातून थोडक्यात बचावले. आता आपण एक उद्योग म्हणून प्रगती करत आहोत, जागतिक दर्जाची सुरक्षा मानके सुनिश्चित करण्यासाठी देखील पावले उचलली पाहिजेत. सणांमध्ये आपण कोणती जोखीम घेतो ते मला आठवले. दरवर्षी मकरसंक्रांतीला लोक छतावरून पडणे, दीपावलीच्या दिवशी फटाक्यांमुळे होणाऱ्या अपघातांमुळे सणांच्या आनंदावर विरजण पडते. होळीनंतर डोळ्यांचे डॉक्टर व्यस्त, तर गरीब बनावट दारूच्या सेवनाच्या बातम्या आपल्याला चिंतित करतात. सण-उत्सव नसताना रस्त्यावर अपघात होतात. प्रत्येक सण हे प्रेम आणि काळजीची भावना व्यक्त करण्याचे माध्यम आहे. म्हणून चांगल्या संरक्षणासह स्वतःवर प्रेम करा. हे तुम्हाला इतर लोकांच्या आणि प्राण्यांच्या सुरक्षिततेबद्दल देखील विचार करण्यास प्रवृत्त करेल. या वेळी होळीच्या दिवशी केवळ पोलिसांना दाखवू नका, तर स्वत:च्या सुरक्षिततेसाठी हेल्मेट आणि सीटबेल्ट वापरा आणि त्याची सवय करा. फंडा असा आहे की, होळी साजरी करताना सर्वोत्तम सुरक्षा धोरणाचे पालन करा आणि समाजात त्याचा प्रचार करा.

एन. रघुरामन, मॅनेजमेंट गुरू [raghu@dbcorp.in]

बातम्या आणखी आहेत...