आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बागबगीचा:नर्सरीतून आणलेली रोपटी सुकतात?

रेणू बरनवाल2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नर्सरीमध्ये हिरवीगार दिसणारी रोपटी घरी आणल्यानंतर काही दिवसांत सुकून जातात. नर्सरीतून आणलेली रोपटी कायम टवटवीत राहावीत यासाठी कोणती निगा राखायला हवी त्याबद्दल जाणून घेऊ...

{ नर्सरीमधून रोपटं विकत घेताना रोपट्याला कीड लागलेली नाही, याची खात्री करून घ्या. प्लास्टिकच्या पिशवीमधून जी रोपटी विकत घेत आहात त्या रोपट्याची मूळं पिशवीच्या बाहेर आलेली नसावी. { घरात येणारा सूर्यप्रकाश, हवा इत्यादींचा विचार करूनच घराच्या आत लावायची रोपटी आणि घराबाहेर लावायच्या रोपट्यांची निवड करा. { रोपटी घरी आणल्यानंतर ती रोपटी सावलीतच ठेवा. जर ही रोपटी तुम्ही जमिनीत लावणार असाल तर जमिनीतल्या मातीमध्ये मूळ धरायला या रोपट्यांना तीन ते चार महिने लागतात.

{ रोपटी चांगल्या पद्धतीने वाढावीत यासाठी माती चांगल्या प्रकारे तयार केलेली असावी. यासाठी ७० टक्के काळी माती, २० टक्के खत आणि १० टक्के वाळू अथवा कोकोपिट एकत्र मिसळून काळी माती तयार करा. { जे रोपटं खरेदी करत आहात ते कलम पद्धतीने लावलेलं आहे की बीजापासून तयार केलेलं आहे, हे माहिती करून घ्या. कारण या दोन्ही प्रकारांमध्ये रोपट्यांची काळजी वेगवेगळ्या प्रकारे घ्यावी लागते. कलम पद्धतीचा वापर केलेल्या रोपट्यांमध्ये फळं-फुलं लवकर येतात. मात्र, बीज पद्धतीच्या रोपट्यांमध्ये फळं-फुलं येण्यासाठी वेळ लागतो. { रोपट्याचं रिपॉटिंग करताना त्याची मुळं तुटणार नाहीत, याची काळजी घ्या. कुंडीमध्ये घातलेलं पाणी निघून जाण्यासाठी छोटसं छिद्र असू द्या. रोप लावण्यासाठी माती घालण्यापूर्वी कुंडीच्या तळाशी विटेचा तुकडा किंवा पणतीचा तुटलेला तुकडा अवश्य ठेवा. { रोपटी रिपॉट केल्यानंतर लगेच पुरेशा प्रमाणात पाणी टाका. रोपटी काही दिवस सावलीच्या ठिकाणीच ठेवा.

बातम्या आणखी आहेत...