आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Opinion
  • Select Open Box Option In E shopping; What Are The Rights Of Online Shopping? | Marathi News

हे जाणून घेणे गरजेचे:ई-शॉपिंगमध्ये ओपन बॉक्सचा पर्याय निवडा ; ऑनलाइन खरेदीचे काय आहेत अधिकार

औरंगाबाद22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ई-कॉमर्सचा वापर वाढत असतानाच ग्राहकांना चुकीचे उत्पादन, वस्तू मिळत असल्याच्या तक्रारीही वाढल्या. कुरिअर कंपनीकडून उत्पादनाची अॅसिसरीज आली नाही. कुरिअरने डिलिव्हरी घेताना तुमच्याकडे काय अधिकार असतात, हे जाणून घेऊ.

ऑनलाइन शॉपिंगमध्ये ग्राहकाचे अधिकार काय आहेत? ऑनलाइन शॉपिंगमध्ये ऑर्डर रद्द केल्यास कंपन्या ग्राहकाकडून कोणतेही शुल्क घेऊ शकत नाही. निकृष्ट किंवा बनावट सामान आल्यास ते परत करणे आणि पैसे परत घेण्याची प्रक्रिया गरजेचे आहे. सामानावर देश, स्रोत नोंदवणे हे ई-कॉमर्स कंपन्यांसाठी आवश्यक मानले जाते.

डिलिव्हरीवेळी चूक टाळण्यासाठी काय करावे? सामान आल्यानंतर पाकीट तत्काळ पडताळून पाहावे. डिलिव्हरी बॉयसमोर पाकीट उघडावे. उत्पादन चुकीचे किंवा खराब असल्यास त्याच्याकडे परत करावे.

प्लॅटफॉर्मचे अधिकृत संकेतस्थळ, अॅप वापरावे. कॅश ऑन डिलिव्हरी, ओपन बॉक्स डिलिव्हरीचा पर्याय निवडावा. त्यामुळे डिलिव्हरी बाॅयसमोर ते स्पष्ट होऊ शकेल. पडताळणी झाल्यावर कंपनी ग्राहकाला ओटीपी देखील पाठवेल. तो डिलिव्हरी पूर्ण झाल्यावर दाखवावा. {कुरिअरने चुकीचे सामान आल्यास? चुकीचे सामान आले किंवा सेवेबाबत समाधानी नसल्यास कंपनीकडे तक्रार देऊ शकता. तक्रारीवर कंपनीला ४८ तासांत उत्तर द्यावे लागेल. डिलिव्हरीत विलंब झाल्यास ते परत पाठवता येऊ शकते.

तक्रारीनंतर रिफंड कधी मिळेल? ई-कॉमर्स कंपन्यांना ३० दिवसांत रिफंड प्रक्रिया पूर्ण करावी लागते. तक्रारीनंतर ग्राहक समाधानी नसल्यास ग्राहक मंचाकडे दाद मागता येते.

बातम्या आणखी आहेत...