आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादोन वर्षे घरात राहिल्यानंतर लोक २०२२ मध्ये प्रवासासाठी गर्दी करू लागले आहेत. मात्र विमानतळ आणि विमानात बसून फोटो काढून पोस्ट करणे आता कमी झाले आहे. विश्वास बसत नसेल तर फेसबुक अकाउंट स्क्रॉल करून पाहा, त्यात सरासरी २०० मधून एखादी पोस्ट दिसू शकते. कारण जगभरातील विमान प्रवासाने आपली चमक गमावली आहे. आता प्रत्येक जण वेळ वाचवण्यासाठी आणि गर्दी टाळण्यासाठी विमान प्रवास करत आहे. कारण रेल्वेचा प्रवास लांब पडतो, कोरोना गेला नाही. प्रवाशांच्या वाढत्या संख्येचा फायदा घेत पैसे कमावण्यासाठी काही विमान कंपन्यांनी कर्मचाऱ्यांच्या कमतरतेेचे कारण सांगून सुविधांमध्ये कपात सुरू केली. उदाहरणासाठी अमेरिकेच्या ईझी जेट एअरलाइन्सने गेल्या महिन्यात मला मेल पाठवला की, कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे आता प्रवाशांना आपले जेवण स्वत: आणावे लागेल किंवा विमानात बसण्याआधी विमानतळावरून घ्यावे लागेल. अर्थात, त्यांनी आम्हाला ‘विमानात पिकनिक’ करण्याचे म्हटले आहे.
भारतात आम्ही आधीच विमानात पिकनिक पाहिली आहे. भारतीय विमानसेवेत कर्मचाऱ्यांची कमतरता आहे म्हणून नव्हे, तर ते ३० रुपयाची ड्रिंक १५० रुपयांत विकतात. शनिवारी रात्री मला अमूलची कोल्ड कॉफी देण्यात आली, ती अजिबात थंडी नव्हती. भोपाळहून निघालेल्या इंडिगो विमानाच्या कर्मचाऱ्यांनी माफी मागितली आणि फ्रीजरमध्ये जागा नसल्याचे सांगितले.
कोरोना वाईट होता, मात्र जगभरातील एअरलाइन्स कंपन्यांनी याचा फायदा घेत सांगितले की, विमान कॅफे नाहीत. त्या उघडपणे सांगतात, प्रवाशांनी स्वत:चे भोजन आणावे.. आम्ही फक्त ट्रान्सपोर्ट कंपनी आहोत, तुम्हाला एका जागेवरून दुसऱ्या जागेवर पोहोचवतो. बरेच लोक रेल्वे प्रवासासाठी जेवण घेऊन जातात. भारत-अमेरिकेच्या प्रवासात १६ ते २४ तासांच्या विमानात ‘नो-स्मोकिंग’ची काही लोकांना सवय पडली होती हेदेखील आमच्या स्मरणात आहे. अशा प्रकारे येणाऱ्या वर्षात लोकांना विमान प्रवासात घरून भोजन घेऊन जाण्याची सवय लागेल. सध्या घरचे जेवण विसरणारे लोक विमानतळाच्या रेस्टॉरंटमधून विकत घेत आहेत, ते खाण्याच्या बाबतीत विमानाला टक्कर देत आहेत. पण हे रेस्टाॅरंट स्वच्छता ठेवत नाहीत ते पाहून नवल वाटतेय. मी शनिवारी रात्री भोपाळच्या राजा भाेज विमानतळावर ‘ईट स्ट्रीट’ रेस्टाॅरंटमध्ये बसलो होतो. मी फोटो काढण्यापर्यंत चारी कर्मचाऱ्यांनी ग्लोव्हज घातले नव्हते. तेथे सांबरही नव्हते. एका हुशार कर्मचाऱ्याने - तो स्वच्छता कर्मचारी होता, सांबरमध्ये पाणी टाकून दिले. मग ते ‘लिक्विड सांबर’ मायक्रोव्हेवमध्ये गरम करून ग्राहकांना देण्यात आले. ते पाहून एका प्रवाशाने वाद घातला त्यामुळे माझे आणि इतर प्रवाशांचे लक्ष गेले. एवढ्या मोठ्या रेस्टॉरंटमध्ये एखाद्या अनधिकृत व्यक्तीने ३०० रुपयांच्या सांबरमध्ये पाणी टाकले यावर विश्वासही बसत नाही. मात्र तेथे तसे घडल्याचे नवल वाटले. एका प्रवाशाने जेव्हा हा व्हिडिओ दाखवला तेव्हा रेस्टाॅरंटच्या कर्मचाऱ्यांनी माफी मागितली. अशा देशात, जेथे अधिकारी ऐकत नाहीत त्यामुळे प्रवाशांनी अशा रेस्टॉरंटमधून काहीच विकत घेऊ नये, जेणेकरून अशा लोकांना शिक्षा मिळाली पाहिजे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.