आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

द कपिल शर्मा शो:स्पर्धा अटीतटीची होते तेव्हा गांभीर्य वाढते : गीता कपूर

छत्रपती संभाजीनगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

द कपिल शर्मा शोमध्ये इंडियाज बेस्ट डान्सर सीझन तीनचे परीक्षक सोनाली बेंद्रे, गीता कपूर आणि टेरेन्स लुईस तसेच मोहक होस्ट जय भानुशाली येणार आहेत. त्यांची चटपटीत उत्तरे आणि कपिल शर्माच्या अतरंगी परिवाराचे हास्य-विनोद प्रेक्षकांना भरपूर हसवतील. इंडियाज बेस्ट डान्सरच्या बाबत सर्वात चांगली गोष्ट कोणती या कपिल शर्माच्या प्रश्नाचे उत्तर देताना प्रसिद्ध कोरिओग्राफर गीता कपूर म्हणाली, “मला ऑडिशन्समध्ये सगळ्यात जास्त मजा येते. एकापेक्षा एक अशा प्रतिभावान डान्सर्सला बघण्याचा आणि त्यांच्याशी परिचय करून घेण्याचा रोमांच भारी असतो! त्यातून अगदी सुरुवातीलाच स्पर्धक आणि परीक्षक यांच्यात छान नाते तयार होते. खूप धमाल येते. स्पर्धा अटीतटीची होते, तेव्हा मग गांभीर्य वाढत जाते. पण त्यामुळे ऑडिशन हा स्पर्धेतील माझ्या आवडता टप्पा आहे. कपिलने गीता कपूरला विचारले की, तुम्ही कधी सोनाली बेंद्रेसोबत काम केले का? त्याला उत्तर देत गीता कपूर म्हणाली, “होय, आम्ही यापूर्वी एकत्र काम केले आहे. मी तिला एका गंभीर टप्प्यात बघितले. ती जेव्हा सेटवर असते, तेव्हा तिचे चित्त अगदी एकाग्र असते. सेटवर आल्या-आल्या ती तालीम सुरू करते, कारण आपले काम तिला चोख करायचे असते. आत्ताही मी एक परीक्षक म्हणून तिच्या शेजारी बसते, तर मला ह्याची सारखी जाणीव होेते.