आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनंत ऊर्जा:उपदेश नव्हे, कार्यातून उदाहरण समोर ठेवा

औरंगाबाद22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

उपदेशक होणे सोपे आहे. सल्ले देण्यात प्रत्येकालाच रसपानाचा आनंद मिळतो, कारण त्यासाठी कष्ट घ्यावे लागत नाहीत, पण त्याचा परिणाम खूपच अल्प असतो. पाण्याच्या बुडबुड्याच्या आयुष्याइतके अल्प. आचरणाची हाक एवढी तीव्र आणि आकर्षक असते की, त्यात वाणीचा गोंगाट हरवून जातो. सोप्या शब्दांत, वाणीपेक्षा आचरणाचा प्रभाव अधिक असतो.

एकदा लालबहादूर शास्त्री आपल्या मुलाला म्हणाले, तू ज्येष्ठांच्या पाया पडतोस, पण माझे निरीक्षण असे आहे की तू नीट नतमस्तक होऊन पायाला हात लावत नाहीस. तारुण्याच्या जोशात मुलाने उत्तर दिले की, मी तर नीट नतमस्तक होतो बाबा, कदाचित तुमच्या पाहण्यात काही चूक झाली असावी.

शास्त्रीजींनी आपल्या मुलाला दिलेले उत्तर तो जन्मभर विसरू शकला नाही. शास्त्रीजींच्या मुलाने आठवून सांगितले की, मी बरोबर व तू चूक आहेस, असे त्यांनी म्हटले असते तर ते मला सामान्य वडिलांसारखे वाटले असते. त्या वेळी त्यांनी मला ज्या पद्धतीने समजावून सांगितले त्यामुळे ते इतर वडिलांपेक्षा वेगळे सिद्ध झाले. बाबा माझ्याजवळ आले आणि योग्य प्रकारे वाकून त्यांनी माझ्या पायांना स्पर्श केला. हे करत असताना ते म्हणाले की, बेटा, तू अशा प्रकारे ज्येष्ठांच्या पाया पडत असशील तर ते बरोबर आहे, मला माफ कर; पण अशा प्रकारे अभिवादन करत नसशील तर इथून पुढे असे करण्यास सुरुवात कर. शास्त्रीजींनी शब्दांनी नव्हे, तर वागण्याने मुलाचे मन जिंकले. बहुधा या जिवंत धड्यानंतर त्यांना आपल्या मुलाला ज्येष्ठांचा आदर करण्याचा योग्य मार्ग शिकवावा लागला नसेल. महान व्यक्तिमत्त्वांचे वैशिष्ट्य म्हणजे ती लांबलचक भाषणे देत नाहीत, तर छोट्या छोट्या कृतीतून जीवनाचे अमूल्य धडे देतात.

उपदेशक होणे सोपे आहे. दुसरीकडे, भाषणाच्या तुलनेत उदाहरण देण्यासाठी कष्ट घ्यावे लागतात, परंतु त्यातून होणारे संस्कार हृदयाच्या भावनांनाही ढवळून काढतात आणि संदेश प्राप्तकर्त्याला अनुसरण करण्यास प्रेरित करतात. सोप्या भाषेत सांगायचे तर बोलण्यापेक्षा आचरणाचा प्रभाव जास्त असतो. थोडक्यात, मुद्दा उपदेशक बनण्याचा नसून, उदाहरण मांडण्याचा आहे. प्रमुख स्वामी महाराजांचे वैशिष्ट्य होते की, ते नेहमी आचरणातून संदेश देत असत, बोलत असत.

१९६० सालची गोष्ट आहे. सारंगपुरात एकादशीचा उत्सव झाला. आस्था धाम येथे आलेल्या भाविकांनी निरोप घेण्यास सुरुवात केली. दुपारची चाहूल लागल्यावर थकलेल्या संत-भक्तांनी विश्रांती घेण्यास सुरुवात केली. प्रमुख स्वामी महाराजही सभागृहात विसावले होते. काही क्षणांनी सहायक संताची अचानक झोप मोडली तेव्हा त्यांना दिसले की प्रमुख स्वामी महाराजांचा पलंग रिकामा आहे. मनात चटकन प्रश्न आला, कुठे गेले प्रमुख स्वामी? संतांनी शोध घेतला आणि मंदिराच्या मागील भागात गेले, तिथे उत्सव कालावधीसाठी जमिनीत छोटे खड्डे करून तात्पुरती शौचालये बांधली होती. तिथले दृश्य पाहून साधू थक्क झाले. तात्पुरती स्वच्छतागृहे स्वच्छ करण्यात प्रमुख स्वामी महाराज एकट्याने गुंतले होते, तेही भर उन्हात, विश्रांती सोडून आणि कोणालाही न कळवता. अशी अनेक उदाहरणे आहेत.

गुरूंच्या अशा वागण्याने शिष्यांना आणि भक्तांना सहज सेवेची प्रेरणा मिळते. भव्य-दिव्य उत्सव-समारंभांत नि:स्वार्थपणे छोटी-छोटी कामे करत असलेले स्वयंसेवक पाहून लोकांना प्रश्न पडतो की, अशी सेवाभावना कुठून येत असेल? या सेवेचा मुख्य स्रोत म्हणजे वर्तनातून शिकवण्याचे प्रमुख स्वामी महाराजांचे तत्त्वज्ञान. त्यांनी नेहमी उदाहरणे देऊनच लोकांना शिकवले आणि समजावून सांगितले. त्यांची वागणूक नेहमीच इतकी श्रेष्ठ होती की, त्यांच्या शब्दांना वजन येत होते. वाणी नव्हे, आचरणाची भाषा बोलल्यास अधिक यश मिळेलच. यासोबतच आत्मिक समाधानही मिळते. आचरण लोकांच्या हृदयाला स्पर्श करते आणि परिवर्तनाच्या आंदोलनात हुंकार भरते. प्रमुख स्वामी महाराजांच्या जीवनातून प्रेरणा घेऊन वाणीऐवजी आचरणाच्या भाषेच्या एक्सप्रेस वेवर झपाट्याने पुढे जाऊया. एक उदाहरण होऊया.

बातम्या आणखी आहेत...