आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलाखत:डिस्नेची चाहती असल्यामुळेच ‘शाकुंतलम’साठी तयार झाले

मुंबई /2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सामंथा रुथ प्रभूला उत्तरेतील लोक ‘द फॅमिली मॅन’मधील राजीच्या भूमिकेतून ओळखतात. आता ती ‘शाकुंतलम’ घेऊन येत आहे. खरं तर ती अशा चित्रपटासाठी तयार नव्हती. तिच्याशी झालेला हा संवाद...

शकुंतलम’ निवडण्याचे कारण? या चित्रपटाचे दिग्दर्शक गुणशेखर गारू माझ्याकडे या चित्रपटाची कथा घेऊन आले होते. मात्र मी त्या वेळी या अशा चित्रपटासाठी तयार नव्हते. कारण मी त्या वेळी ‘द फॅमिली मॅन’साठी अॅक्शन मोडमध्ये होते. शिवाय इतरही वास्तविक जीवनावरील चित्रपट करत होते. मी आधी ‘शाकुंतलम’ला नकारच दिला होता. मात्र मला आव्हानं स्वीकारायला आवडतात. त्यामुळे आधी नकार दिला होता, मात्र तीन-चार दिवसांत विचार करून पुन्हा होकार दिला. यासाेबतच गुणशेखर गारू ज्यांची ही कल्पना आहे, ती कमालीची आहे. मला बालपणापासूनच डिस्नेचे पात्र आवडते, मी त्याची मोठी चाहती आहे. यात बालपणीचे ते स्वप्न जगण्याची संधी मिळणार होती, त्यामुळे होकार दिला. राजी पात्रानंतर शकुंतलाच्या पात्रासाठी कसा बदल केला ? मला या पात्रासाठी बॉडी लँग्वेजवर काम करावे लागले. कारण शाकुंतलमचा अर्थच सुंदरता आणि नाजूक व्यक्तिमत्त्व आणि तेच माझ्यात नाही. कारण मी थोडी टॉम बॉयसारखी आहे. मला गुणशेखर यांनी बॉडी लँग्वेजचे प्रशिक्षण दिले. तसं तर गुणशेखरचं ‘शाकुंतलम’ विषयी व्हिजन क्लिअर होते. मी फक्त त्याच्या दृष्टीचे अनुसरण करत केले. मी नुकताच पूर्ण चित्रपट पाहिला. तो पाहून प्रेक्षकांनाही अभिमान वाटेल, मला असे वाटते.

मायोसायटिस आजारातून जावे लागले, त्यानंतर कमबॅक... यावर काय सांगशील ? खरं सांगायचं तर मी अजूनही त्यातून जात आहे. प्रत्येक माणसाच्या आपल्या अडचणी असतात. तो आपल्या पद्धतीने हँडल करत असतो. खरं तर, अशा लोकांवर योद्धा असल्याचा ठपका ठेवला जातो. मात्र तसं काही नसते. अनेकदा रडण्याचे मन होते, सर्व काही साेडण्याचे मन होते. पण तसं काही नसतं. लोक अशा कठीण काळाविषयी बोलायला घाबरतात, किंवा बाेलत नाहीत. मात्र त्या दिवसांवरही चर्चा व्हायला हवी. जेणेकरून सर्वसामान्यांना समजेल की, जीवनात कठीण दिवस आणि कठीण लाटांचा सामना केला तर चांगले दिवस नक्कीच येतात. काळ कितीही वाईट असला तरी तो शाश्वत राहू शकत नाही.

‘शाकुंतलम’मध्ये काय आव्हाने होती? हा चित्रपट दोन तास आणि २० मिनिटांचा आहे. त्यात दोन तासाचे व्हीएफएक्स शॉट आहेत. त्यातून प्राणी आणि रहस्यमयी जंगल तयार करण्यात आले आहे. त्या वातावरणात शूट करणे खूपच अवघड होते. शिवाय आम्ही कोरोनामध्ये शूट केले होते. लिमिटेड संसाधनांमध्ये आम्ही तीन महिन्यात शूट केले. सेटवर कमी लोक असायचे त्यामुळे आम्हाला शूट करण्यास जास्त वेळ लागला. इतर वेळ सीजी वर्कमध्ये गेला. ‘द फॅमिली मॅन’साठी कशा प्रकारे राज आणि डीके तुमच्याकडे अाले होेते?

‘द फॅमिली मॅन’साठी कशा प्रकारे राज आणि डीके तुमच्याकडे अाले होेते? श्रीलंकेतील बंडखोर संघटनेशी ते पात्र जोडलेले असते, त्यामुळे ते पात्र जिवंत वाटावे, त्यासाठी काय करता येईल ते करण्यासाठी मी तयार होते. कारण ते पात्र बऱ्याच लोकांसाठी खूपच गंभीर आणि महत्त्वाचे होते. खरं तर शूटदरम्यान मी रोज प्रार्थना करायचे की, त्या पात्राला न्याय देण्याचा प्रयत्न करेल. त्यासाठी मी खूप माहितीपट पाहिले. मी राजीला खलनायक म्हणून पाहिले नाही. ज्याच्या आयुष्यात अनेक पर्याय आहेत, अशा व्यक्तीच्या भूमिकेत मी तिला पाहिले, ज्याची निवड करून ती आपले उर्वरित आयुष्य समर्पित करते. अर्थात, ती काहींसाठी खलनायक असू शकते, पण मी राजीची भूमिका खलनायक म्हणून मी केली नाही. तिने निवडलेला पर्याय चुकीचा असेलच असे नाही.