आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासप्टेंबर २०२२ मध्ये महसा अमिनीची इराणमध्ये पोलिस कोठडीत हत्या झाली. आरोप होता की तिने व्यवस्थित हिजाब घातला नव्हता. यानंतर महिला आपले केस कापत आहेत, हिजाबविना बाहेर पडत आहेत. याचे व्हिडिओ अलीनेजाद जगासमोर आणताहेत. मसीह अलीनेजाद सांगताहेत इराणी महिलांच्या संघर्षाची कहाणी..
आ मच्याकडे कोणतेही शस्त्र नाही. आमचा आवाजच शस्त्र आहे. इराण सरकार मला आणि माझ्या सोशल मीडियाला घाबरले आहे. सरकार असंतुष्टांना घाबरते, कारण सरकारविरोधात बोलण्याची हिंमत असलेल्यांना आम्ही एकत्र करत आहोत. सरकार माझ्या विरोधात आहे. मला २००७ मध्ये निर्वासित केलेे. परंतु मी थांबले नाही. इराणी महिलांची हिजाब घालण्यापासून आणि भेदभाव करणाऱ्या कायद्यांपासून मुक्ततेसाठी मी सोशल मीडियाचा वापर केला. हिजाबविरोधात इराणी महिलांच्या एेक्यासाठी २०१४ मध्ये फेसबुक पेज सुरू केले. इराणी महिलांना हिजाबशिवाय फोटो या पेजवर पोस्ट करण्यास सांगितले. मी हिजाबच्या विरोधात नाही. परंतु हिजाब घालायचा की नाही, याचा अधिकार प्रत्येक महिलेला असावा. यासाठी त्यांना बाध्य केले जाऊ शकत नाही. इराणी स्त्रिया पाषाणयुगाच्या नियमांनी त्रस्त आहेत. हिजाबची सक्ती हे महिला अत्याचाराचे सर्वात मोठे प्रतीक आहे. मी त्याची तुलना बर्लिनच्या भिंतीशी करते.ही भिंत पाडली तर इराणमधून कट्टरवादी इस्लामिक प्रजासत्ताक नाहीसे होईल. इराणच्या विद्यापीठांमध्ये ६० टक्के विद्यार्थी मुली आहेत, असे अनेकदा म्हटले जाते. हे खरे आहे, परंतु इराणी महिला सत्तेपासून वंचित आहेत. संसदेत २९९ जागा असून त्यात केवळ नऊ महिला आहेत. चांगली बाब अशी आहे की प्रथमच कुर्द, बलुची, अरब आणि तुर्की यांच्यात एकता आहे. या एकजुटीला सरकार घाबरले आहे, कारण ते त्यांच्या राजवटीचा पाया डळमळीत करत आहे. त्यांना माहीत आहे की ८०% इराणी लोकांना आता बदल हवा आहे. पण क्रूरता आणि भीतीमुळे सगळेच रस्त्यावर उतरत नाहीत. पोलिसांच्या गोळीबारामुळे अनेक तरुण आंधळे झाले आहेत आणि महिलांवर कारागृहांत अत्याचार होत आहेत. सुरक्षा दल लोकांना एकत्र येऊ देत नाही. मी नुकतीच युरोपियन देशांच्या नेत्यांना भेटले आहे आणि त्यांना इराणमधील महिलांच्या नेतृत्वातील आणि पुरुषांकडून समर्थन मिळालेल्या जगातील सर्वात प्रगतशील क्रांतीपैकी एक असलेल्या आमच्या क्रांतीला मान्यता देण्यास सांगितले आहे. {शब्दांकन : मोहंमद अली
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.