आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआता थोड्याच दिवसात शालेय विद्यार्थ्यांच्या परीक्षांना सुरूवात होईल. वर्षभर केला जाणारा अभ्यास आणि परीक्षेच्या काही दिवस आधी केला जाणारा अभ्यास यामध्ये फरक असतो. शेवटच्या टप्प्यात करणं अपेक्षित असणाऱ्या स्मार्ट अभ्यासाच्या या काही टिप्स...
रोजचे टाइम टेबल बनवा परीक्षेच्या अंतिम टप्प्यातल्या तयारीमधलं टाइम टेबल हे आठवड्याचं नाही तर एकेक दिवसाच्या तयारीचं असायला हवं. म्हणजे कॅलेंडरवरच्या प्रत्येक तारखेच्या ठिकाणी संबंधित दिवशी करावयाच्या अभ्यासाच्या नोंदी लिहून ठेवा. पुस्तकांमध्येही याचप्रमाणे तारखा आणि सराव टॅग करू शकता.
धड्यांना कलर टॅग करा ज्या दिवशी जो धडा वाचायचा आहे, त्या धड्याला विशिष्ट रंगांच्या टॅगने मार्क करून ठेवा. त्या धड्याशी संबंधित संदर्भ इतर पुस्तकांमध्येही वाचायचे असतील तर त्यांनाही त्याच रंगाने टॅग करून ठेवा म्हणजे अभ्यासाच्या वेळी गोंधळ उडणार नाही. याच पद्धतीने ज्या दिवशी ज्या धड्यांचा सराव करायचा आहे, त्याच्या नोंदी टाइम टेबलवर त्याच रंगामध्ये करून ठेवल्यास आज कसला अभ्यास करायचा आहे, हे स्पष्ट होईल.
‘लाल रंगा’च्या नोंदी सराव करते वेळी काही भाग कठीण वाटत असेल, त्याची पुन्हा रिव्हीजन करणे आवश्यक वाटत असेल, काही भाग वाचायला राहिला असेल किंवा वाचून पूर्ण झालेला असेल तर त्यांच्या नोंदी कॅलेंडर अथवा टाइम टेबलवर लाल रंगाच्या स्केच पेनने करून ठेवा, जेणेकरून नंतर परत केल्या जाणाऱ्या सरावाच्या वेळी मोजक्या सरावाला अधिक वेळ देता येऊ शकेल.
अडचणींच्या नोंदी कॅलेंडर किंवा अभ्यासाच्या नियोजनासाठी केलेल्या टाइम टेबलवर आणखी एका गोष्टीची नोंद अवश्य करावी आणि ती गोष्ट म्हणजे, अभ्यासादरम्यान अथवा सरावादरम्यान अभ्यासात येणाऱ्या अडचणी. शिक्षक किंवा शाळा-कॉलेजातील सिनिअर्सना या अडचणी विचारायच्या असल्यास, अडचणींचं स्वरूप आणि ज्याच्याकडून संकल्पना स्पष्ट करून घ्यायची आहे त्याचं नाव अशा पद्धतीने नोंदी लाल रंगांच्या मार्कर पेनने करून ठेवाव्यात.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.