आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआधुनिक तंत्रज्ञान, स्मार्टफोन, हाय पाॅवर म्युझिक सिस्टिम आणि इअरफोनच्या वाढत्या वापरामुळे तरुणांमध्ये बहिरेपणा वाढत आहे. डब्ल्यूएचओच्या नुसार, जगात जवळपास १५० कोटी लोक कोणत्या ना कोणत्या प्रकारे ऐकण्याच्या समस्येला तोंड देत आहेत. ही संख्या २०५० पर्यंत वाढून २५० कोटी कोटी होण्याचा अंदाज आहे. असेच फ्रान्सच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ अँड मेडिकल इन्स्टिट्यूटने १.८६ लाख लोकांवर केलेल्या संशाेधनात आढळले की, जीवनशैली, सामाजिक विलगीकरण, डिप्रेशन व मोठ्या अावाजाच्या संपर्कात आल्याने ऐकण्याची क्षमता सतत कमी होत आहे. हेडफोन, इअरबड तसेच धूम्रपान, हाय बीपी, शुगर आणि काही संसर्गामुळे ही क्षमता घटते. मोठ्या आवाजाची ठिकाणे जसे कारखाने, वाहतूक, डीजे आदीत काम करणाऱ्यांना इअर प्रोटेक्शन डिव्हायसचा वापर आवश्यक आहे. आज जाणून घेऊ ऐकण्याची क्षमता कशा पद्धतीने प्रभावित होत आहे.
वय : ऐकण्याच्या क्षमतेला कायमची हानी वाढत्या वयासोबत कानांत केसांच्या रूपात आढळणाऱ्या नाजूक पेशी नष्ट होऊ लागतात. वैद्यकीय भाषेत याला वयासोबत घटणारी ऐकण्याची क्षमता अथवा प्रेसबिक्यूसस म्हणतात. सामान्यपणे यात दोन्ही कानांची ऐकण्याची क्षमता घटते आणि हे नुकसान कायम राहते.
धूम्रपान व दारू : भीती ७०% जास्त धूम्रपानामुळे हियरिंग लॉसची भीती ७०% जास्त असते. तंबाखूच्या धुरात फॉर्मलडिहाइड, आर्सेनिक व हायड्रोजन सायनाइडसारखे केमिकल असतात, ज्यांच्यामुळे ऐकण्याची क्षमता प्रभावित होते. तसेच जास्त मद्य प्राशनामुळे मेंदूला आवाज ऐकण्यास जास्त जोर द्यावा लागतो.
आजार, जखम : जन्मापासून असू शकते समस्या वैद्यकीय किंवा अानुवंशिक कारणांमुळेही ऐकण्याची क्षमता कमी होऊ शकते. अनेक मुलांना जन्मापासूनच ऐकू येत नाही, तर काहींत वयासोबत ही क्षमता घटते. व्हायरल आणि बॅक्टेरियल संसर्ग व सामान्य सर्दी, खोकल्यामुळेही कमी ऐकू येते. हाय बीपीमुळेही ऐकण्याची क्षमता घटते.
तीव्र आवाज : पेशींचे नुकसान तीव्र गोंधळ कानाच्या आतील पेशींना हानी पोहोचवते, त्यामुळे ऐकण्याची क्षमता हळूहळू कमी होऊ लागते. मात्र ही हानी तात्पुरती असते. परिस्थिती बदलली तर ते पुन्हा चांगले करता येते, मात्र जर बदल केला नाही तर ती हानी कायमची होते.
ऐकण्याच्या क्षमतेला सुरक्षित ठेवण्याचे हे तीन उपाय
पहिला : ६०% चा नियम लाभदायक मोबाइलच्या अावाजाची कमाल तीव्रता ६० टक्के वा त्यापेक्षा कमी ठेवली तर हेडफोन किंवा इअरबड्सपासून नुकसानीची शक्यता जवळपास नगण्य असते. मात्र, जर तीव्र आवाजात संगीत ऐकू इच्छित असाल तर मोबाइलच्या आवाजाच्या क्षमतेच्या ८०% पर्यंत ९० मिनिटे ऐकू शकता.
दुसरा : डोळे, नाकाचा संसर्ग टाळा डोळे आणि नाकाशी संबंधित एखादा संसर्ग आहे तर त्याच्या उपचाराकडे दुर्लक्ष नको. त्याचा थेट संबंध कानांच्या ऐकण्याच्या क्षमतेशी असतो. तसेच कानातही काहीही टाकून स्वच्छ करण्याचा प्रयत्न टाळा, ते कानाच्या कोमल त्वचेचे नुकसान करू शकतात.
तिसरा : साउंड लोकेशन अॅक्टिव्हिटी करा आवाज करणाऱ्या गोष्टी जसे फोन आणि रेडिओला मोठा आवाजात (निश्चित मर्यादेत) चालू करून खोलीच्या दोन्ही कोपऱ्यात ठेवा. आता खोलीत चाला. दोन ते तीन ओळींची कविता, वाक्य वा लेख वाचा. आता डोळे बंद करून पुन्हा म्हणा.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.