आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासरसंघचालकांनी संत रविदास जयंतीनिमित्त तीन खूप महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या. पहिली, जातिव्यवस्था पंडितांनी बनवली; दुसरी, शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला लिहिलेल्या पत्राचा हवाला देत त्यांनी सांगितले की, हिंदू-मुसलमान सर्व देवाने बनवले आहेत यामुळे त्यांच्यात भेदभाव करू नका; तिसरे, कोणताही समाज ३०% जास्त नोकऱ्या देऊ शकत नाही यामुळे लाेकांनी स्वयंराेजगाराचा मार्ग निवडावा. जगातील सर्वात मोठ्या वैचारिक संघटनेच्या प्रमुखांचे हे वक्तव्य केवळ हिंदूंनाच नव्हे सर्व धर्माच्या अनुयायांसाठी ध्रुवतारा होऊ शकते. रामचरितमानसच्या काही श्लोकांवरून गेल्या काही दिवसांपासून काही नेते जातीयतेला पोषक आणि वरचा-खालचा मानणारे म्हणत आहेत. त्यामुळे जातीय विषमता वाढत आहे. एखादी वरच्या जातीची व्यक्ती, एखाद्या दलित नवरदेवाला घोड्यावर बसू देत नाही किंवा एका धर्माचे लोक दुसऱ्या धर्माच्या व्यक्तीला जबरदस्ती करतात तेव्हा त्यांना बहुतेक ईश्वराची व्यवस्था माहिती नसते. याकडे सरसंघचालकांनी मागच्या दसऱ्याला लक्ष वेधले होते. आज हीच गोष्ट त्या अतिरेक्यांनी विचारात घ्यायला हवी, ज्यांना वाटते की ते हत्या करून देवाचा आदेश पाळत आहेत. समाजातील हे दोन्ही विचार अनेक शतके मागे टाकत आहेत. सरसंघचालकांचे म्हणणे आहे की, नोकरीच्या मागे धावण्याऐवजी स्वयंरोजगार करा, हा चांगला सल्ला आहे. मात्र सतत बदलणारे तंत्रज्ञान आणि पैशांच्या दबदब्याच्या काळात स्वयंरोजगाराची मर्यादा फक्त भजी विकण्यापुरतीच मर्यादित होते. या विपरीत शासकीय वा संघटित क्षेत्रातील नोकऱ्या त्यांना भविष्याचे संरक्षण देतात.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.