आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Opinion
  • Some Lessons On Making Sweets And Snacks Healthier | Article By N. Raghuraman

मॅनेजमेंट फंडा:मिठाई आणि फराळ आरोग्यदायी बनवण्याचे काही धडे

औरंगाबाद5 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

काही महिन्यांपूर्वी तयारी सुरू झालेल्या कुटुंबातील एका लग्न समारंभासाठी मिठाई आणि फराळ निवडण्यात ६० तास घालवल्यानंतर, पंधरा दुकाने आणि अनेक टेस्टिंग सेशन्स केल्यानंतर मी या गोष्टींची निवड केवळ महत्त्वाच्या प्रसंगीच नव्हे, तर रोजच्या वापरासाठी कशी करावी, याचा धडा शिकलो. त्याचे काही धडे पुढीलप्रमाणे. जळगावातील प्रसिद्ध महालक्ष्मी मिठाईचे दुकान चालवणारे शैलेश कोलते यांनी मला विचारले, तुम्ही मिठाई अटाटा (एटीएटीए) सूत्रानुसार निवडली आहे का? मी थोडा वेळ उत्तर देऊ शकलो नाही. या संक्षेपाचा अर्थ समजायला मला दहा मिनिटे लागली. येथे ए म्हणजे अ‍ॅपिअरन्स, म्हणजे मिठाई कशी दिसते? यामध्ये आपल्याला तिचे आकार, रंग आणि संयोजन, तसेच भिन्न रंग एकमेकांशी जुळतात का व एखादा रंग गहाळ आहे का, हे पाहायचे असते. शेवटी आपण मिठाईचा आकार पाहतो की, ते कापून खावे लागेल की तोंडात पूर्ण जाईल. टी म्हणजे टेक्श्चर म्हणजे आपण मिठाई उचलतो तेव्हा आपल्या हाताला कसे वाटते? ती कठीण, मऊ, रसाळ किंवा चावू खाण्यायोग्य आहे का? आपण ज्या व्यक्तीसाठी किंवा गटासाठी घेत आहोत त्याला ते अनुरूप आहे का? पुढील ए म्हणजे अरोमा, म्हणजे तिचा वास कसा आहे? इथे बघायचे आहे की तिचा सुगंध फ्रुटी, फ्लॉवरी, स्मोकी, ऑयली की चॉकलेटी आहे? दुसरा टी टेस्टसाठी आहे. म्हणजे चाखल्यावर तिची चव कशी लागते? मिठाईची चव तिच्या सुगंधाशी अनुरूप असावी, हे खूप महत्त्वाचे आहे. आणि शेवटचा ए म्हणजे आफ्टरटेस्ट. म्हणजेच मिठाई खाल्ल्यानंतर तोंडात कोणती चव दीर्घकाळ राहते? काही फ्लेवर्स असे असतात की, ते नेहमी तोंडात टिकवून ठेवायचे असतात आणि दुसरे काही खाऊन मजा संपवायची नसते. मी शैलेशकडून हेही शिकलो की, तुम्हाला मिठाई दीर्घ काळ ठेवायची असेल तर शोकेसमध्ये लाइटखाली ठेवलेल्या मिठाई घेणे टाळा. बल्बमधून निघणारी अतिनील किरण त्यांचे ऑक्सिडायझेशन करू शकतात. त्यामुळे सेल्समनला काउंटरवर ठेवलेल्या मिठाईऐवजी मागच्या ट्रेमध्ये ठेवलेली मिठाई घ्या. तुम्ही हलवायाने त्यात वापरलेली साखरदेखील तपासू शकता. त्यात नियमित साखर असेल तर त्यात सल्फर असेल. फार्मास्युटिकल ग्रेड साखर वापरणारे हलवाई निवडा. हीच गोष्ट फराळालाही लागू होते. कमी दर्जाच्या तेलात तळलेले पदार्थ आपल्यासाठी वाईट असतात, हे खरे आहे, पण जास्त एमयूएफए (मोनो अनसॅच्युरेटेड फॅटी अ‍ॅसिड्स) तेलात तळलेला फराळ चांगला असतो, असे व्यावसायिक शेफ मानतात. ते एचडीए म्हणजेच उच्च घनता लिपोप्रोटीन्स कोलेस्टेरॉल वाढवतात, त्याला चांगले कोलेस्टेरॉलदेखील म्हणतात. पण, मी आणि माझा ख्यातनाम शेफ मित्र संजीव कपूर यांची अशी धारणा आहे की, तेलामध्ये ओमेगा फॅक्टर कितीही चांगले असले तरी ते जास्त प्रमाणात सेवन केले तर नुकसानच होते. असे असले तरी उच्च तापमानात तळल्यावर ओमेगा जीवनसत्त्वे नष्ट होतील. इंदूरचे न्यूरो सर्जन डॉ. दीपक कुलकर्णी मला नेहमी मिठाई आणि तळलेले पदार्थ फार कमी खाण्याचा सल्ला देतात - चवीपुरते खावे, त्याने पोट भरू नये. { फंडा असा ः निरोगी जीवन जगायचे असेल तर हवा, पाणी आणि अन्न यांच्या गुणवत्तेबद्दल कोणताही धडा नेहमीच महत्त्वाचा असतो.

एन. रघुरामन, मॅनेजमेंट गुरू [raghu@dbcorp.in]

बातम्या आणखी आहेत...