आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Opinion
  • Some Things That Connect Each Other In Daily Life | Article By Rashmi Bansal

नवा विचार:दैनंदिन जीवनामध्ये परस्परांना जोडून ठेवणाऱ्या काही गोष्टी

औरंगाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपल्या देशात विविध प्रांत, भाषा, जाती, धर्मांचे लोक एकमेकांशी जोडलेले आहेत, हा एक प्रकारचा चमत्कार मानला जातो. तसे पाहता राष्ट्रगीत, तिरंगा ध्वज आणि क्रिकेट संघ हे आपल्या एकतेचे प्रतीक आहेत. पण, आपल्याला एकमेकांशी जोडणाऱ्या काही दैनंदिन गोष्टीही आहेत. श्रीमंत असो की गरीब, हिंदू असो वा मुस्लिम, किंवा जैन-शीख-ख्रिश्चन, प्रत्येक घरात या गोष्टी तुम्हाला आढळतील. आणि मी तुम्हाला खात्रीने सांगू शकते की, परदेशात यांचा वापर लोकांना माहीतच नाही. मी कोणत्या गोष्टींबद्दल बोलत आहे? बघूया, तुमच्या घरात किती उपलब्ध आहेत.

प्रेशर कुकर : माझी मुलगी परदेशात शिकायला गेली तेव्हा आम्ही तिला प्रेशर कुकर दिला. तिने पहिल्यांदा त्याचा वापर केला तेव्हा शिट्टीचा आवाज ऐकून तिचा रूममेट घाबरून घरातून पळून गेल्या. कारण त्यांना वाटले फायर अलार्म वाजला आहे. बरं, नंतर म्हणाल्या, ही कामाची वस्तू आहे. आमच्यासाठीही आण!

मसाल्याचा डबा : आपण हळद, मीठ, मिरची, धने पावडर, मोहरी, जिरे आणि गरम मसाला ठेवतो तो एक स्टीलचा गोलाकार डबा. यामुळे स्वयंपाक करणे खूप सोपे होते. हो, पोर्तुगीज आणि ब्रिटिश मसाल्यांच्या शोधातच या देशात आले होते, पण आजही त्यांना काळ्या मिरीपेक्षा अधिक काही सहन होत नाही. बिचारे!

झाडू : हे प्रत्येक घरात वापरले जाते. तुम्ही छंद म्हणून व्हॅक्यूम क्लिनर घेतला असेल तर तो वर्षातून दोनदा वापरला जातो. रोजच्या स्वच्छतेसाठी झाडू हा एकमेव स्वस्त, सोपा आणि योग्य उपाय आहे. हे काम स्वत: करण्याची जबाबदारी घेतली तर महागड्या जिममध्ये जाण्याची गरज नाही!

पंखा : यावर्षी ब्रिटन आणि युरोपमध्ये उष्णतेची लाट जाणवली. आणि बहुतेक घरांमध्ये एसी तर सोडाच, पंखाही नाही. अहो, महाराजांच्या काळापासून आपण उन्हाळा पंख्यांच्या जोरावरच पार केला. तेव्हा ते हाताने चालायचे, आता विजेवर. प्रत्येक घर काही ना काही सांगते, पंखा मनाला थंड ठेवतो!

सोने : बंगला असो वा झोपडपट्टी, प्रत्येक घरातील महिलांच्या कानात किंवा हातात खरे सोने असते. हो, चोरीच्या भीतीने आणि बदलत्या फॅशनच्या युगात कृत्रिम दागिन्यांचा ट्रेंड आला आहे. पण तरीही घरातील किंवा बँकेतील लॉकरमध्ये हे नक्कीच सापडेल. त्याला इंग्रजीत आयसिंग ऑन द केक म्हणतात, हिंदीत सोने पे सुहागा.

रद्दी : आपण वर्तमानपत्रे खरेदी करतो, पण फेकून देत नाही. कारण महिन्याच्या शेवटी रद्दी विकणारा आपल्या घरी रद्दी घ्यायला येतो, किलोनुसार पैसेही देतो. अहो, इतर कोणत्याही देशात पैसे देऊनही अशी सेवा मिळत नाही. त्यामुळे पुढच्या वेळी रद्दी विकताना रद्दीवाल्यांनाही थोडा आदर दाखवा!

रुमाल : शाळा असो किंवा ऑफिस, आई रुमालाशिवाय आपल्याला घराबाहेर पडू देत नाही. न जाणो, कधी शिंक किंवा घाम येईल. बॉर्डरवर हलके पट्टे असलेला रुमाल पांढरा असावा. आणि हो, मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये जागा मिळवण्यासाठीही कामाला येतो… रुमाल. कमाल आहे ना!

या यादीतील क्रमांक ५ व्यतिरिक्त प्रत्येक वस्तू इको-फ्रेंडली प्रकारात येते. वापरा व फेका ही मानसिकता आपल्या देशात नव्हती. आज आपणही डिस्पोजेबल संस्कृती स्वीकारत आहोत, तर इतर देश टिकाऊपणाचे गोडवे गात आहेत. त्यामुळे आपल्यालाही प्लास्टिक पिशवी सोडून पुन्हा अभिमानाने कापडी पिशवी घ्यायची आहे. स्टीलचा ग्लास थंड करायचा आहे. मातीच्या माठातील गोड पाण्याची अनुभूती मुलांना द्यायची आहे. आधुनिक अवश्य व्हा, पण डोके वापरून. वैज्ञानिक, आर्थिक व आरोग्य फायदेही कशात आहे, हे जाणून घ्या. माझी यादी फक्त एक झलक आहे, मला ईमेलद्वारे आणखी मुद्दे पाठवा. आज आपले लक्ष समानतेपेक्षा मतभेदांवर अधिक आहे. पण, अदृश्य धाग्यांत अजूनही ताकद आहे. याकडे लक्ष दिले, एकमेकांना आदर दिला तर देश मजबूत, आनंदी, समृद्ध व महान होईल. (ही लेखिकेची वैयक्तिक मते आहेत.) रश्मी बन्सल लेखिका आणि वक्त्या mail@rashmibansal.in

बातम्या आणखी आहेत...