आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जीवनमार्ग:कुटुंबातील कुणी तरी जागे राहणे गरजेचे!

छत्रपती संभाजीनगर13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपल्या घरात किमान एक तरी कुटुंबीय जागृत राहील, असा प्रयत्न करा. हे ऐकून सर्व जण म्हणतील की, आमच्या घरातील प्रत्येक जण दिवसभर जागा राहतो. येथे मुद्दा तसे जागे राहण्याबद्दल नाही. खरं तर आपण सगळेच कुठे ना कुठे बेशुद्ध असतो. जागृत नसतो. आणि त्यामुळे आपले कुटुंब अस्वस्थ होते. येथे जागे होणे म्हणजे शुद्धीत येणे, जागे होणे म्हणजे कठीण प्रसंगी आनंदी असणे, प्रत्येक कुटुंबीयासाठी जगण्याची इच्छा असणे. एक छोटीशी घटना आहे. एका फिल्म फेस्टिव्हलमध्ये ज्युरी आर्ट फिल्म पाहत होते. आणि एक सदस्य वगळता सर्व ज्युरी झोपी गेले. आर्ट फिल्म्सच्या बाबतीत अनेकदा असं होतं. पण जो जागा होता, त्याने चित्रपट पूर्ण झाल्यावर इतर सदस्यांना सांगितले की, तुम्ही सर्वांनी एकदा हा चित्रपट पाहावा, असा माझा आग्रह आहे. आणि त्याच चित्रपटाला पुरस्कार मिळाला. कथेचा संदेश असा की, एक जण जागा होता, म्हणून त्याने इतर सर्वांना जागे केले आणि निकाल योग्य लागला. कुटुंबातील जागरूकतेची पद्धत म्हणजे सामूहिक योग. कुटुंबीय खूप व्यग्र असतील तर किमान ते जेवणाच्या टेबलावर एकत्र आल्यावर, जेवण करण्यापूर्वी, आपली पाठ सरळ करून बसा आणि डोळे बंद करा व कोणत्याही योग पद्धतीचा थोडक्यात अवलंब करा. ध्यान करा. येथूनच प्रबोधनाची सुरुवात होईल.

पं. िवजयशंकर मेहता humarehanuman@gmail.com Facebook:Pt. Vijayshankar Mehta

बातम्या आणखी आहेत...