आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Opinion
  • Sow The Seeds Of Culture In Children At The Right Time | Article By Pt. Vijayshankar Mehta

जीवनमार्ग:मुलांमध्ये संस्काराचे बीज वेळीच पेरा

औरंगाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महामारी संपली. मग सण आला. लोकांनी हा सण अगदी नवीन पद्धतीने साजरा केला. कमाईचे नवीन मार्गही मिळाले. त्याचा वापर आरोग्य सेवांवरही होत आहे. मात्र, महामारीनंतर त्याचा विपरीत परिणाम शैक्षणिक क्षेत्रात दिसून येत आहे. आताच याकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही तर येणाऱ्या काळात शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे सर्वत्र नवे विद्यार्थी दिसतील, ही महामारीचीच देण आहे. ऑनलाइन शिक्षणाचे चांगले-वाईट परिणाम समजून घेण्याची वेळ आली आहे. सध्याचे विद्यार्थी वेगळ्या पद्धतीने सक्रिय शिकणारे झाले आहेत. गेमिफिकेशनने शिक्षणात प्रवेश केला आहे. शैक्षणिक जगतात ऑटोमेशन आणि तंत्रज्ञानाचा आधुनिक वापर स्वागतार्ह आहे. पण एक गोष्ट दुर्लक्षित होत आहे आणि ती म्हणजे संस्कार. यंत्रावर आधारित विद्यार्थ्यांना वेळीच संस्कारांशी जोडले नाही तर ते नक्कीच मानवी बॉम्ब बनतील. आता शिक्षणविश्वात तंत्रज्ञानाचे वादळ आले आहे. एका मोठ्या वादळात आपले घर उद्ध्वस्त होईल, अशा दृश्याची कल्पना करा, पण आपला जीव वाचला तर आपण काय करणार? तुम्ही उद्ध्वस्त झालेले घर पाहत राहाल, त्या भीषण वादळाला शिव्याशाप देत राहाल किंवा ते पुन्हा येऊ नये म्हणून काही कराल. त्यामुळे वेळीच मुलांना संस्काराची जोड द्यायला हवी. हे संस्कार त्यांच्या जीवनात यश आणि शांतता यांच्यात संतुलन निर्माण करतील. पं. िवजयशंकर मेहता humarehanuman@gmail.com Facebook:Pt. Vijayshankar Mehta

बातम्या आणखी आहेत...